ठळक मुद्देजसप्रीत बुमराची विक्रमी कामगिरी, घेतल्या सहा विकेट्स2018 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाजभारताकडे पहिल्या डावात 292 धावांची आघाडी
मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : जसप्रीत बुमराच्या वैविध्यपूर्ण गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने बॉक्सिंग डे कसोटीत पहिल्या डावात 292 धावांची आघाडी घेतली. बुमराने सहा फलंदाजांना माघारी पाठवून ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 151 धावांवर संपुष्टात आणला. भारताने पहिला डाव 7 बाद 443 धावांवर घोषित केला. ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन न देता कर्णधार विराट कोहलीने पुन्हा फलंदाजीला मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. बॉक्सिंग डे कसोटीच्या तिसऱ्या दिवशी बुमराची कामगिरी उल्लेखनीय ठरली. सहा विकेट घेत त्याने कॅलेंडर वर्षात सर्वात 45 विकेट्स घेण्याचा भारतीय गोलंदाजांचा विक्रम नावावर केला.
ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर मार्कस हॅरिस (22) आणि कर्णधार टीम पेन (22) यांनी सर्वाधिक धावा केल्या. बुमराने कॅलेंडर वर्षात 45 विकेट्स घेत मोहम्मद शमीला ( 43) मागे टाकले. याआधी 2006 मध्ये अनिल कुंबळेने कॅलेंडर वर्षात 41 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. बुमरा आणि शमी यांनी 2018 मध्ये हा विक्रम मोडला. पदार्पणाच्या वर्षात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रमही बुमराने नावावर केला. त्याने ऑस्ट्रेलियाच्या टॅरी अॅल्डर्मन ( 1981) आणि वेस्ट इंडिजच्या कर्टली अॅम्ब्रोस ( 1988) यांचा 42 विकेट्सचा विक्रम मोडला.
बुमराने याशिवाय आणखी एक पराक्रम केला. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बुमराने एका डावात पाचपेक्षा अधिक विकेट घेतल्या आहेत. कॅलेंडर वर्षांत अशी कामगिरी करणारा तो पहिलाच आशियाई गोलंदाज आहे. त्याने आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्ग येथे 54 धावांत 5 आणि इंग्लंडविरुद्ध ट्रेंट ब्रिज येथे 85 धावांत 5 विकेट घेतल्या होत्या. मेलबर्नवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने 33 धावांत 6 विकेट घेतल्या.
बुमराने या दौऱ्यात पाच डावांत एकूण 17 विकेट घेतल्या आहेत. त्याने 14.11 ची सरासरी राखली, तर 2.08 चा इकॉनॉमी रेट ठेवला. ऑस्ट्रेलियातील ही भारतीय गोलंदाजाची चौथी सर्वोत्तम कामगिरी आहे. या विक्रमात कपिल देव ( 8/106), अनिल कुंबळे ( 8/141) हे आघाडीवर आहेत. बुमराने अजित आगरकरचा ( 6/41) विक्रम मोडला.
Web Title: IND vs AUS 3rd Test: Boom ... Boom ... Jasprit Bumrah trash Australia, create many records
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.