IND vs AUS 3rd Test, Australia Team drawback: भारतीय संघ सध्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० ने आघाडीवर आहे. भारतीय संघाने पहिली कसोटी एका डावाने जिंकली तर दुसऱ्या सामन्यात भारताने चौथ्या डावात सहज विजय मिळवला. असे असताना आता तिसरा इंदूरच्या मैदानावर असणार आहे. तेथे लाल मातीची खेळपट्टी बनवण्यात आल्याची शक्यता आहे. त्यामुळे ही खेळपट्टी फिरकी आणि वेगवान गोलंदाजी अशी दोन्हीसाठी पोषक असेल अशी चर्चा आहे. ऑस्ट्रेलियन संघाला या सामन्यात काहीतरी कमाल करून दाखवणे गरजेचे आहे. त्यामुळए त्यांचा संघ कंबर कसून तयारीला लागला आहे. पण त्याच दरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा याने ऑस्ट्रेलियन संघाची सर्वात मोठी कमतकता सांगितली.
"मला वाटते की ऑस्ट्रेलियन फलंदाज भारतात फिरकी गोलंदाजी कशी खेळावी याबाबत आखलेल्या योजनेप्रमाणे खेळले नाहीत. पहिल्या कसोटीत ते खूपच बचावात्मक होते तर दुसऱ्या कसोटीत ते फारच आक्रमक खेळायला गेले. त्यांना आपल्या फलंदाजीमध्ये समतोल साधणे आवश्यक आहे आणि क्रीजवर जास्तीत जास्त वेळ घालवण्यावर भर देणेही गरजेचे आहे. तसेच सगळ्यात मोठा तोटा म्हणजे, ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबूशेन या दोन फलंदाजांवरच खूप अवलंबून आहेत. त्यामुळे ते दोघे ढेपाळले तर संघाची घडी विस्कटते असं दिसतंय," असं विश्लेषण ग्लेन मॅकग्राने केले.
"ट्रेव्हिस हेडसाठी हे वर्ष चांगले गेले आहे आणि आता संपूर्ण फलंदाजी युनिटला आपली सांघिक कामगिरी दाखवावी लागणार आहे. वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क आणि अष्टपैलू कॅमेरून ग्रीन यांच्या अनुपस्थितीमुळे संघाचा समतोल बिघडला, परंतु नागपुरातील पहिल्या कसोटीसाठी हेडला वगळण्यासारख्या निवड निर्णयांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले," याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या-चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, शुभमन गिल, रवींद्र जडेजा, केएस भरत (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, इशान किशन, श्रेयस अय्यर, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव, उमेश यादव.
Web Title: IND vs AUS 3rd Test Glenn McGrath Australia relying too much on Smith and Labuschange
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.