मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाने मेलबर्न कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियाला 137 धावांनी पराभव मानण्यास भाग पाडले. भारताच्या 399 धावांचा पाठलाग करताना कांगारूंचा दुसरा डाव 261 धावांवर आटोपला. जसप्रीत बुमराने सामन्यात ( 6/33 व 3/53) नऊ विकेट घेत विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्याला मॅन ऑफ दी मॅच पुरस्काराने गौरविण्यात आले. या कामगिरीसह भारताने कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. भारताचा हा 150 वा कसोटी विजय ठरला. आशियाई देशांमध्ये अशी कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- IND vs AUS 3rd Test : अशी कामगिरी करणारा भारत ठरला पहिलाच आशियाई संघ
IND vs AUS 3rd Test : अशी कामगिरी करणारा भारत ठरला पहिलाच आशियाई संघ
IND vs AUS 3rd Test: भारतीय संघाने मेलबर्न कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियाला 137 धावांनी पराभव मानण्यास भाग पाडले.
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 8:54 AM
ठळक मुद्देभारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला 137 धावांनी पराभव मानण्यास भाग पाडले. 41 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत दोन विजयकोहलीची परदेशात (11) सर्वाधिक विजयाच्या विक्रमाशी बरोबरी