ठळक मुद्देमयांक अग्रवाल आणि हनुमा विहारी यांनी भारतीय संघाला सकारात्मक सुरुवात करुन दिली. मयांक अग्रवालने कसोटीत पदार्पणात अर्धशतक पूर्ण केलेदत्तू फडकर यांनी 1947 मध्ये नोंदवलेला विक्रम मोडला
मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : बॉक्सिंग डे कसोटीत भारतीय संघ नव्या जोडीने मैदानावर उतरला. मयांक अग्रवाल आणि हनुमा विहारी यांनी भारतीय संघाला सकारात्मक सुरुवात करुन दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी संयमी खेळ करताना 40 धावा जोडल्या. मात्र हनुमा माघारी परल्यानंतर मयांकने सामन्याची सुत्रे हातात घेतली. पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या मयांकच्या चेहऱ्यावर कोणतेही दडपण दिसत नव्हते. त्याने पदार्पणात अर्धशतक झळकावताना 71 वर्षांपूर्वीचा दत्तू फडकर यांचा विक्रम मोडला.
मेलबर्नवर होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी लोकेश राहुल आणि मुरली विजय या दोन्ही सलामीवीरांना बाकावर बसवण्याचा निर्णय घेतला. या दोघांच्या अनुपस्थितीतमयांक आणि हनुमा यांनी डावाची सुरुवात केली. 2018 मध्ये भारताकडून पदार्पण करणारा मयांक हा सहावा खेळाडू ठरला. याच वर्षी जसप्रीत बुमरा, रिषभ पंत, हनुमा, पृथ्वी शॉ आणि शार्दूल ठाकूर यांनी कसोटीत पदार केले. 2011 नंतर प्रथमच हा योग जुळून आला. 2011 मध्येही सहा खेळाडूंनी भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले होते. विराट कोहली, प्रविण कुमार, आर अश्विन, अभिनव मुकुंद, उमेश यादव आणि वरुण आरोन हे ते पदार्पणवीर होते.
पॅट कमिन्सने ही भागीदारी संपुष्टात आणली. मयांकने मात्र आत्मविश्वासाने खेळ करताना पदार्पणात अर्धशतक झळकावले. त्याने खणखणीत चौकार खेचून अर्धशतक पूर्ण केले. परदेशात पदार्पणात एकाही भारतीय सलामीवीराला शतक झळकावता आलेले नाही आणि मयांक हा पराक्रम करेल, अशी आशा आहे. 48 धावांवर असताना मयांकने चौकार खेचून अर्धशतक पूर्ण केले. ऑस्ट्रेलियात पदार्पणात सर्वाधिक धावांचा विक्रम त्याच्या नावावर जमा झाला आहे. याआधी हा विक्रम दत्तू फडकर यांच्या नावावर होता. त्यांनी 1947साली झालेल्या सिडनी कसोटीत पदार्पणात 51 धावा केल्या होत्या. मयांकने 71 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला.
Web Title: IND vs AUS 3rd Test: Mayank Agarwal S broke 71 year old record
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.