Join us  

IND vs AUS 3rd Test : मयांक अग्रवालची प्रतीक्षा संपली, सातत्यपूर्ण कामगिरीची अखेर दखल!

मेलबर्न येथे बुधवारपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत भारताने संघ जाहीर करताना मयांक अग्रवालला संधी दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 1:24 PM

Open in App
ठळक मुद्देतिसऱ्या कसोटीत भारताने संघ जाहीर करताना मयांक अग्रवालला संधीमाजी कसोटीपटू सुनील गावसकर यांनी केली होती शिफारसलोकेश राहुल व मुरली विजय या अपयशी जोडीला डच्चू

मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : मेलबर्न येथे बुधवारपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत भारताने संघ जाहीर करताना मयांक अग्रवालला संधी दिली. पृथ्वी शॉला दुखापत झाल्यामुळे मयांकचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीच्या उर्वरित दोन सामन्यांसाठी संघात समावेश करण्यात आला होता. तिसऱ्या कसोटीत तो पदार्पण करणात आहे. मयांकने स्थानिक स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. कर्नाटक आणि भारत A संघाकडूनही त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. 

मयांकने लिस्ट A क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 48.71च्या सरासरीने आणि 100.72च्या स्ट्राइक रेटने 3605 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 78 डावांमध्ये 49.98च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत. 2017-18च्या मोसमात त्याने स्थानिक स्पर्धेत 2141 धावा केल्या आहेत आणि त्या सत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत तो आघाडीवर होता.  या कामगिरीच्या जोरावर त्याची वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवड करण्यात आली होती. मात्र, त्याला अंतिम अकरामध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही आणि त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्याला न्यूझीलंड A दौऱ्यासाठीच्या भारत A संघात स्थान देण्यात आले आणि तेथे त्याने पाच डावांत एक अर्धशतकी खेळी केली. पर्थ कसोटीत भारताची सलामीची जोडी पुन्हा अपयशी ठरल्यानंतर माजी कसोटीपटू सुनील गावस्कर यांनी अग्रवालला संघात घेण्याची मागणी केली.  

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीबीसीसीआय