ठळक मुद्देलोकेश राहुल व मुरली विजय यांना डच्चूतिसऱ्या कसोटीत मयांक अग्रवाल व रवींद्र जडेजाला संधीमयांकसोबत सलामीला कोण येणार हा पेच
मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : मेलबर्न येथे बुधवारपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघाने अंतिम 11 खेळाडूंची नावे जाहीर केली. लोकेश राहुल व मुरली विजय या दोन्ही सलामीवीरांना डच्चू देण्यात आला आहे. या सामन्यात मयांक अग्रवाल आंतरराष्ट्रीय कसोटीत पदार्पण करणार आहे. त्याचे सलामीचे स्थान पक्के असले तरी त्याच्या जोडीला कोणाला संधी मिळेल, हे उद्याच ठरेल. मयांकसोबत सलामीला हनुमा विहारी आणि रोहित शर्मा यांची नावे चर्चेत आहेत.
राहुल आणि विजय यांना या मालिकेत पहिल्या दोन सामन्यांत मिळून 95 धावाच करता आल्या आहेत. त्याशिवाय या जोडीने मागील अकरा डावांमध्ये 15 च्या सरासरीने 166 धावा केल्या आहेत. यात केवळ एकच अर्धशतकी भागीदारी केली आहे. त्यामुळे त्यांना अखेरीस डच्चू देण्यात आला. त्यामुळे मयांक व विहारी तिसऱ्या कसोटीत भारताच्या डावाची सुरुवात करतील असा अंदाज आहे. रोहित शर्मा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येईल, परंतु नेटिझन्सने रोहित आणि मयांक यांनी सलामीला यावे अशी डिमांड केली आहे.
दरम्यान, आर अश्विन अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे जडेजाला स्थान देण्यात आले. दुसऱ्या कसोटीतील टीका झाल्यानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी जडेजा तंदुरुस्त नसल्याचा दावा केला होता. मात्र, बीसीसीआयने त्यांचा हा दावा खोडून काढला आणि जडेजाला तंदुरुस्त घोषित करून संघात समाविष्ट करून घेतले. ऑस्ट्रेलियानेही तिसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर केला आहे. त्यांनी संघात एक बदल करतना पीटर हॅण्ड्सकोम्बच्या जागी मिचेल मार्शला संधी दिली आहे.
भारतीय संघ : विराट कोहली, अजिंक्य रहाणे, मयांक अग्रवाल, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमरा.
Web Title: IND vs AUS 3rd Test: Netizens Demand Rohit Sharma open with Mayank Agrawal
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.