IND vs AUS 3rd Test : बॉर्डर -गावस्कर कसोटी मालिकेत ०-२ अशा पिछाडीवर पडलेल्या ऑस्ट्रेलियासमोरील अडचणी काही कमी होण्याच्या नाव घेत नाहीत. कर्णधार पॅट कमिन्स ( Pat Cummins) हा कौटुंबिक कारणासाठी मायदेशात परतला. त्याच्यानंतर डेव्हिड वॉर्नर ( कोपऱ्याची दुखापत), ॲश्टन ॲगर, जोश हेझलवूड, टॉड मर्फी, मिचेल स्वेपसन, लान्स मॉरिस व मॅथ्यू रेनशॉ हेही मालिकेतून माघारी परतले आहेत किंवा परतण्याच्या तयारीत आहेत. वॉर्नर व हेझलवूड यांनी कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. त्यात आताच हाती आलेल्या वृत्तानुसार कमिन्सने तिसऱ्या कसोटीतून माघार घेतली आहे. कमिन्सच्या आईची प्रकृती जास्तच गंभीर आहे आणि अशा वेळी त्याने आईसोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत स्टीव्ह स्मिथ ( Steve Smith) ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करणार आहे.
वर्ल्ड कपनंतर १० दिग्गज खेळाडू घेऊ शकतात वन डेतून निवृत्ती; आश्चर्यचकित करेल शेवटचे नाव
भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने ६ दिवसांत बॉर्डर-गावस्कर मालिका गमावली. भारताने नागपूर पाठोपाठ दिल्ली कसोटीही तीन दिवसांच्या आत जिंकली आणि २-० अशी आघाडी घेताना बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्वतः जवळ कायम राखली. भारताने सलग चौथ्यांदा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला. १ मार्चपासून तिसरी कसोटी इंदूर येथे खेळवली जाणार आहे आणि त्यात कमिन्स खेळणार नाही. तो चौथ्या कसोटीसाठी परत येण्याची शक्यता आहे. ''मी सध्या भारतात परत येण्याच्या मनस्थितीत नाही. सध्या कुटुंबियांसोबत रहावे, हेच मला योग्य वाटतेय. क्रिकेट ऑस्ट्रेलिया व सहकाऱ्यांनी दिलेल्या पाठींब्याचा मी ऋणी आहे. मला समजून घेतल्याबद्दल आभार,''असे कमिन्स म्हणाला.
दुसऱ्या कसोटीनंतर स्मिथ पत्नी डॅनीसह दुबईत फिरायला गेला होता आणि तो गुरुवारी संध्याकाळी पुन्हा भारतात आला. कमिन्सचा निर्णय समजल्यानंतर त्याने लवकरच सुट्टी आटोपली. २०२१नंतर स्मिथ तिसऱ्यांदा ऑसी संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे. स्मिथने २०१४ ते २०१८ या कालावधीत ३४ कसोटी सामन्यांत नेतृत्व केले आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ - पॅट कमिन्स ( कर्णधार), ॲश्टन ॲगर, स्कॉट बोलंड, ॲलेक्स केरी, कॅमेरून ग्रीन, पीटर हँड्सकोम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हीस हेड, उस्मान ख्वाजा, मॅट कुहनेमन, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेपसन, डेव्हिड वॉर्नर
- तिसरी कसोटी इंदूर : १ मार्चपासून सुरू होईल
- चौथी कसोटी अहमदाबाद – ९ ते १३ मार्च.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IND vs AUS 3rd Test : Pat Cummins ruled out of the 3rd Test due to family reasons, Steve Smith will lead the Australian side in Cummins' absence
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.