IND vs AUS 3rd Test Live Update : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातला तिसरा कसोटी सामना उद्यापासून इंदूर येथे सुरू होणार आहे. रोहित शर्माच्या ( Captain Rohit sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघाने दिल्ली आणि नागपूर कसोटी तीन दिवसांत जिंकून मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. या दोन्ही सामन्यांत भारतीय गोलंदाजांची कामगिरी अफलातून झाली, परंतु आघाडीच्या फलंदाजांचे अपयश नजरअंदाज करण्यासारखे नव्हते. त्यात लोकेश राहुल ( KL Rahul) च्या फॉर्माची बरीच चर्चा आहे. त्यामुळेच तिसऱ्या व चौथ्या कसोटीसाठी BCCI ने जाहीर केलेल्या संघात केएल राहुलकडून उप कर्णधारपद काढून घेतले गेले. त्यात रोहितने कसोटी क्रिकेटच्या प्रसारासाठीचा विराट कोहलीचा मुद्दा खोडून काढला.
KL Rahul ला उप कर्णधारपदावरून हटवण्यामागे काय संकेत? रोहित शर्माचं महत्त्वाचं विधान
शुभमन गिलने नेटमध्ये कसून सराव केला आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड त्याच्या फलंदाजीकडे बारीक लक्ष ठेऊन होते. लोकेश आणि शुभमन यांना नेट्समध्ये बाजूबाजूला सराव करायला लावले होते. तिसऱ्या कसोटीपूर्वी रोहितने आघाडीची फळी अपयशी ठरत असल्याचे मान्य केले. तो म्हणाला, आघाडीच्या फलंदाजांकडून अपेक्षित कामगिरी होत नाही, यात सत्यता आहे. पण, या फलंदाजांमध्ये प्रचंड कौशल्य आहे आणि त्यांचे फॉर्मात येणे संघाला फायदेशीर ठरू शकते. आम्ही तिसरी कसोटी जिंकल्यास, चौथ्या कसोटीत ( अहमदाबाद) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनलची तयारी म्हणून मैदानावर उतरू.''
विराट कोहलीने कसोटी क्रिकेट हे भारतात केवळ पाच केंद्रावर खेळवले जायला हवेत असे मत व्यक्त केले होते. त्याबाबत रोहितला विचारण्यात आले. तो म्हणाला, जर तुम्हाला कसोटी क्रिकेटचा प्रचार-प्रसार करायचा आहे, तर तो भारतात सर्वत्र खेळला गेला पाहिले. फक्त पाच केंद्रावर कशाला? कसोटी क्रिकेट ज्या पद्धतीने खेळलं जात आहे, ते पाहून आनंद होतोय. देशाच्या कानाकोपऱ्यात कसोटी क्रिकेट घेऊन जायला मला आवडेल.
तिसऱ्या व चौथ्या कसोटीसाठीचा संघ - रोहित शर्मा, लोकेश राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जयदेव उनाडकट
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"