Join us  

IND vs AUS 3rd Test : KL Rahul ला उप कर्णधारपदावरून हटवण्यामागे काय संकेत? रोहित शर्माचं तिसऱ्या कसोटीपूर्वी महत्त्वाचं विधान 

IND vs AUS 3rd Test Live Update : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातला तिसरा कसोटी सामना उद्यापासून इंदूर येथे सुरू होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 12:35 PM

Open in App

IND vs AUS 3rd Test Live Update : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातला तिसरा कसोटी सामना उद्यापासून इंदूर येथे सुरू होणार आहे. रोहित शर्माच्या ( Captain Rohit sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघाने दिल्ली आणि नागपूर कसोटी तीन दिवसांत जिंकून मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. या दोन्ही सामन्यांत भारतीय गोलंदाजांची कामगिरी अफलातून झाली, परंतु आघाडीच्या फलंदाजांचे अपयश नजरअंदाज करण्यासारखे नव्हते. त्यात लोकेश राहुल ( KL Rahul) च्या फॉर्माची बरीच चर्चा आहे. त्यामुळेच तिसऱ्या व चौथ्या कसोटीसाठी BCCI ने जाहीर केलेल्या संघात केएल राहुलकडून उप कर्णधारपद काढून घेतले गेले. तिसऱ्या कसोटीपूर्वी कर्णधार रोहितला याबबात विचारले असता त्याने महत्त्वाचे विधान केले. 

वेस्ट इंडिजचा रोविंद्र रामनरीन कसा बनला रॉबिन सिंग?

राहुलने गेल्या दहा डावांत २५ हून कमी धावा केल्या. ४७ कसोटींत त्याची धावसरासरी ३५ पेक्षा कमी आहे. त्यामुळेच त्याच्या जागी तिसऱ्या कसोटीत युवा फलंदाज शुभमन गिल याला संधी दिली जावी अशी मागणी होत आहे. शुभमनने नेटमध्ये कसून सरावही केला आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड त्याच्या फलंदाजीकडे बारीक लक्ष ठेऊन होते. लोकेश आणि शुभमन यांना नेट्समध्ये बाजूबाजूला सराव करायला लावले होते. तिसऱ्या कसोटीपूर्वी रोहितने आघाडीची फळी अपयशी ठरत असल्याचे मान्य केले. तो म्हणाला, आघाडीच्या फलंदाजांकडून अपेक्षित कामगिरी होत नाही, यात सत्यता आहे. पण, या फलंदाजांमध्ये प्रचंड कौशल्य आहे आणि त्यांचे फॉर्मात येणे संघाला फायदेशीर ठरू शकते. आम्ही तिसरी कसोटी जिंकल्यास, चौथ्या कसोटीत ( अहमदाबाद) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनलची तयारी म्हणून मैदानावर उतरू.''

यावेळी लोकेशचा प्रश्न येताच रोहित म्हणाला, त्याला उप कर्णधारपदावरून हटवले याचा अर्थ काहीच होत नाही. आम्हाला काही दर्शवायचे नाही. उप कर्णधार असो किंवा नसो संघ तुम्हाला काही सूचित करत नाही. 

तिसऱ्या व चौथ्या कसोटीसाठीचा संघ -  रोहित शर्मा, लोकेश राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जयदेव उनाडकट  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियालोकेश राहुलरोहित शर्मा
Open in App