Join us  

IND vs AUS 3rd Test : धाव घेताना सलामीवीर शुभमन गिल जखमी, पोटाला दुखापत; क्रिकेट चाहते चिंतेत...

IND vs AUS Test: ऑस्ट्रेलियाने बुधवारी भारताला 109 धावांवर ऑल आउट केले आणि 47 धावांची आघाडी घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2023 8:39 PM

Open in App

India vs Australia 3rd Test: इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरोधात सुरू असलेल्या तिसर्‍या कसोटीत (IND vs AUS) शुभमन गिल (Shubhman Gill) जखमी झाला. धाव घेत असताना शुभमन पडला आणि त्याच्या पोटात दुखापत झाली. खराब फॉर्ममध्ये केएल राहुलऐवजी शुभमनला संघात घेतले. पण, आता तो जखमी झाल्यामुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे.

इंदूरमधील तिसऱ्या कसोटीच्या सुरुवातीला कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सामन्यात शुभमनने मिचेल स्टार्कचा चेंडू मिडऑन फिल्डर टॉड मर्फीकडे भिरकावला. तो रन घेण्यासाठी धावला, पण धोका असल्याचे लक्षात येताच त्याने वेळेत क्रीजमध्ये प्रवेश करण्यासाठी डायव्हिंग केले. या प्रयत्नात गिलच्या पोटाला दुखापत झाली. त्याच्या दुखापतीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

बुधवारी पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने भारताला 109 धावांत ऑलआउट केले. विराट कोहलीने सर्वाधिक 22 धावा केल्या, तर शुभमन गिलने 21 धावा केल्या. ऑस्ट्रेलियन फिरकी आक्रमणाचा सामना करण्यात भारतीय फलंदाज अपयशी ठरले. डावखुरा फिरकीपटू मॅथ्यू कुहनमनने कसोटी क्रिकेटमध्ये पहिले पाच बळी (5/16) नोंदवले, तर नॅथन लियॉनने 35 धावांत 3 बळी घेतले. टॉड मर्फीनेही एक विकेट घेतली. 

टॅग्स :शुभमन गिलभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलिया
Open in App