ठळक मुद्देभारत-ऑस्ट्रेलिया तिसरी कसोटी बुधवारपासून बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी भारतीय खेळाडूंची विश्रांतीला पसंतीविराट कोहली व अनुष्का शर्मा दिसले सोबत
मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न येथे खेळवण्यात येणार आहे. चार सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी आतापर्यंत एक-एक सामना जिंकला आहे. त्यामुळे 'बॉक्सिंग डे' कसोटीचा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. बुधवारपासून सुरू होणाऱ्या या सामन्यापूर्वी भारतीय खेळाडू विश्रांती घेत आहेत. तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय खेळाडू रविवारपासून सरावाला सुरुवात करणात आहेत. भारतीय संघ मेलबर्न येथे दाखल झाला आहे आणि कर्णधार विराट कोहली मेलबर्न येथील एका मॉलमध्ये पत्नी अनुष्का शर्मासोबत दिसला. शाहरुख खान, अनुष्का आणि कॅटरिना कैफ यांची प्रमुख भूमिका असलेला 'Zero' हा चित्रपट कोहली व अनुष्काने पाहिला.
प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशीच कोहली आणि अनुष्काने हा चित्रपट पाहिला. कोहलीने सफेद टी-शर्ट आणि जीन्स घातली होती. अनुष्काच्या चाहत्यांनी कोहली व अनुष्काचा मॉलमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. कोहली नेहमीच अनुष्काच्या चित्रपटांना पसंती देत आला आहे. याआधीही त्याने अनुष्काच्या सुई धागा या चित्रपटाचे कौतुक केले होते. त्याने हा चित्रपट नक्की पाहा असे ट्विटही केले होते.
रवी शास्त्रींचे डोळे कधी उघडणार, पराभवानंतरही सरावापेक्षा संघाला देतायत विश्रांतीदरम्यान, पर्थ कसोटी गमावल्यावर एखादा व्यावसायिक संघ लगेच पुढच्या सामन्याच्या तयारीला लागेल. सरावामध्ये घाम गाळेल. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पराभव झाल्यावर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे डोळे उघडलेले दिसत नाही. तिसऱ्या सामन्यापूर्वी खेळाडूंकडून सराव घेण्यापेक्षा त्यांनी विश्रांती देण्यावर भर दिल्याचे समोर आले आहे.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये शास्त्री यांनी सांगितले की, " दुसरा सामना जरी आम्ही गमावला असला तरी आम्हाला विश्रांतीची गरज आहे. पहिल्यांदा आम्ही विश्रांती घेऊ आणि त्यानंतरच सराव करू. पण दुसऱ्या सामन्यानंतर आम्ही विश्रांतीवर अधिक भर देणार आहोत."
Web Title: IND vs AUS 3rd Test: Virat Kohli watch 'Zero' cinema with anushka sharma before 'Boxing Day' Test
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.