Join us  

IND vs AUS 3rd Test : विराट कोहलीचीच 'दादा'गिरी, परदेशात धडाकेबाज कामगिरी

IND vs AUS 3rd Test : भारतीय संघाने बॉक्सिंग डे कसोटीत विजय मिळवून ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 8:37 AM

Open in App
ठळक मुद्देभारतीय संघाने बॉक्सिंग डे कसोटीत विजय मिळवून ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली.परदेशात सर्वाधिक विजय मिळवणारा भारतीय कर्णधारसौरव गांगुलीच्या विक्रमाशी केली बरोबरी

मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाने बॉक्सिंग डे कसोटीत विजय मिळवून ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने 2018 सालचा शेवट विजयाने केला. भारताने विजयासाठी ठेवलेल्या 399 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ 261 धावांवर तंबूत परतला आणि विराट सेनेने 137 धावांनी विजय मिळवला. या विजयाबरोबर भारताने चार सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. 2018 हे वर्ष विराटमय विक्रमाने ओळखले जाणारे वर्ष ठरले. त्याने वर्षाच्या अखेरच्या कसोटीत विजय मिळवून माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या विक्रमाशी बरोबरी केली, परंतु या बरोबरीत विराटचीच दादागिरी दिसून येते.मेलबर्न कसोटीत भारतीय संघ चौथ्या दिवशीच विजय मिळवेल असे वाटत होते. मात्र ऑसी गोलंदाज कमिन्स भारताच्या विजयमार्गात उभा राहिला. त्याने चौथ्या दिवशी नॅथन लियॉनसह नवव्या विकेटसाठी नाबाद 43 धावांची भागीदारी केली. कमिन्सने 103 चेंडूत 61 धावा करत ऑस्ट्रेलियाचा पराभव चौथ्या दिवसापुरता टाळाला. पाचव्या दिवशी त्याच्या मदतीला पावसाने धाव घेतली आणि पहिले सत्र वाया घालवले. पण भारताने हा सामना 137 धावांनी जिंकण्यात यश मिळवले. या विजयाने भारताने 41 वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी केली. भारताने दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियात दोन कसोटी सामने जिंकले आहेत. यापूर्वी बिशनसिंग बेदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने 1977-78 च्या मालिकेत दोन कसोटी विजय मिळवले होते. तसेच मेलबर्नवरील भारताचा हा ( 1978 व 1981) तिसरा विजय ठरला. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताचा हा परदेशातील 11 वा कसोटी विजय ठरला. यासह त्याने गांगुलीच्या सर्वाधिक 11 विजयांशी बरोबरी केली. मात्र, गांगुलीने 28 सामन्यांत 11 विजय मिळवले होते आणि कोहलीला केवळ 24 सामन्यांत हा पराक्रम करता आला.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीसौरभ गांगुलीबीसीसीआय