भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या चौथ्या सामन्यात ९ बदल; वर्ल्ड कप गाजवणारा फलंदाज टीम इंडियात...

IND vs AUS 4rth T20I Live : चौथ्या ट्वेंटी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, भारत पुन्हा प्रथम फलंदाजी करणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 06:42 PM2023-12-01T18:42:26+5:302023-12-01T18:42:42+5:30

whatsapp join usJoin us
IND vs AUS 4rth T20I Live :  Australia have won the toss and opted to bowl again, . 4 changes for india & 5 changes for Australia  | भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या चौथ्या सामन्यात ९ बदल; वर्ल्ड कप गाजवणारा फलंदाज टीम इंडियात...

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या चौथ्या सामन्यात ९ बदल; वर्ल्ड कप गाजवणारा फलंदाज टीम इंडियात...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs AUS 4rth T20I Live : चौथ्या ट्वेंटी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, भारत पुन्हा प्रथम फलंदाजी करणार... ऑस्ट्रेलियाने आज ३० वर्षीय ख्रिस ग्रीनला पदार्पणाची संधी दिली आहे. दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला हा खेळाडू ऑस्ट्रेलियात न्या साऊथ वेल्सकडून खेळतो. शिवाय त्याने जगभरातील वेगवेगळ्या फ्रँचायझी लीग गाजवल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या संघात ५ बदल करण्यात आले आहेत. स्टॉयनिस, मॅक्सवेल, इंग्लिस, रिचर्डसन व एलिस यांना विश्रांती दिली गेलीय. 


 भारतीय संघातही आज ४ बदल पाहायला मिळाले आहेत. प्रसीद कृष्णाच्या जागी मुकेश कुमार, अर्शदीप सिंगच्या जागी दीपक चहर, तिलक वर्माच्या जागी श्रेयस अय्यर आणि इशान किशनच्या जागी जितेश शर्मा याची निवड केली गेली आहे. भारतीय संघाने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने शतकी खेळी करून मालिकेतील आव्हान राखले होते. पण, त्या सामन्यानंतर तो मायदेशी परतला आहे. 

भारतीय संघ - ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, जितेश शर्मा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, अक्षर पटेल, दीपक चहर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार. ( India: 1 Yashasvi Jaiswal, 2 Ruturaj Gaikwad, 3 Shreyas Iyer, 4 Suryakumar Yadav, 5 Jitesh Sharma, 6 Rinku Singh, 7 Axar Patel, 8 Deepak Chahar, 9 Ravi Bishnoi, 10 Avesh Khan, 11 Mukesh Kumar)

ऑस्ट्रेलियाचा संघ - जोश फिलिप्स, ट्रॅव्हिस हेड, बेन मॅकडेर्मोट, आरोन हार्डी, टीम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, मॅथ्यू वेड, ख्रिस ग्रीन, बेन डॉर्शूस, जेसन बेहरेनडॉर्फ, तनवीर संघा ( Australia: 1 Josh Phillippe, 2 Travis Head, 3 Ben McDermott, 4 Aaron Hardie, 5 Tim David, 6 Matthew Short, 7 Matthew Wade, 8 Ben Dwarshuis, 9 Chris Green, 10 Jason Behrendorff, 11 Tanveer Sangha)
 

 

Web Title: IND vs AUS 4rth T20I Live :  Australia have won the toss and opted to bowl again, . 4 changes for india & 5 changes for Australia 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.