रिंकू सिंग, जितेश शर्माची फटकेबाजी; तरीही ऑस्ट्रेलियन गोलंदाज पडले भारी

IND vs AUS 4rth T20I Live : चौथ्या ट्वेंटी-२० सामन्यांत भारतीय संघाची आघाडीची फळी आज फार कमाल दाखवू शकली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 08:39 PM2023-12-01T20:39:47+5:302023-12-01T20:40:12+5:30

whatsapp join usJoin us
IND vs AUS 4rth T20I Live : Rinku Singh ( 46), Ruturaj Gaikwad ( 32), Yashasvi Jaiswal ( 37) & Jitesh Sharma ( 32), India 174/9 | रिंकू सिंग, जितेश शर्माची फटकेबाजी; तरीही ऑस्ट्रेलियन गोलंदाज पडले भारी

रिंकू सिंग, जितेश शर्माची फटकेबाजी; तरीही ऑस्ट्रेलियन गोलंदाज पडले भारी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs AUS 4rth T20I Live : चौथ्या ट्वेंटी-२० सामन्यांत भारतीय संघाची आघाडीची फळी आज फार कमाल दाखवू शकली नाही. यशस्वी जैस्वाल व ऋतुराज गायकवाड यांनी दुहेरी धावसंख्या केली, परंतु सूर्यकुमार यादव व श्रेयस अय्यर हे स्वस्तात बाद झाले. रिंकू सिंग व जितेश शर्मा यांनी मिळालेल्या संधीचं सोनं करताना ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची धुलाई केली. ऑस्ट्रेलियाच्या जेसन बेहरेनडॉर्फ व तनवीर संघा यांनी प्रत्येकी २, तर बेन डीवॉरशूईसने ३ विकेट्स घेतल्या. 

यशस्वी जैस्वालने आक्रमक सुरुवात करून देताना ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकात यशस्वीची ( ३७) विकेट पडली. वर्ल्ड कप गाजवणाऱ्या श्रेयस अय्यरचे आज ट्वेंटी-२० संघात आगमन झाले, पंरतु तनवीर संघाने त्याला ८ धावांवर माघारी पाठवले. सूर्यकुमार यादव मागील सामन्याप्रमाणे आजही ऋतुराजला साथ देईल असे वाटलेले, परंतु बेन डीवॉरशूईसने त्याला १ धावेवर झेलबाद केले. यष्टिरक्षक मॅथ्यू वेडचा हा पन्नासावा झेल ठरला आणि ट्वेंटी-२०त असा पराक्रम करणारा तो पहिला यष्टिरक्षक ठरला. रिंकू सिंगला आज मोठी खेळी करण्याची संधी मिळाली आणि त्याने खणखणीत फटकेही मारले.


ऋतुराजही चांगले फटके मारत होता, परंतु फिरकीपटू संघाने त्याला गुगलीवर झेलबाद केले. ऋतुराज २८ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ३२ धावांवर बाद झाला. ऋतुराज व रिंकू सिंग यांनी ३१ चेंडूंत ४८ धावांची भागीदारी केली. मॅच फिनिशर रिंकूने आज अधिक षटकं खेळण्याच्या संधीचं सोनं करण्याच्या निर्धार बांधला होता. त्याचे उत्तुंग फटके पाहण्यासारखे होते. जितेश शर्मानेही दोन खणखणीत षटकार खेचून इरादा स्पष्ट केला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ३२ चेंडूंत ५६ धावांची भागीदारी केली. जितेश १९ चेंडूंत ३ षटकार व १ चौकारा लगावून ३५ धावांवर बाद झाला.  अक्षर पटेल भोपळ्यावर माघारी परतला. रिंकूचेही अर्धशतक हुकले. त्याने २९ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ४६ धावा केल्या. भारताला २० षटकांत ९ बाद १७४ धावा करता आल्या. 

Web Title: IND vs AUS 4rth T20I Live : Rinku Singh ( 46), Ruturaj Gaikwad ( 32), Yashasvi Jaiswal ( 37) & Jitesh Sharma ( 32), India 174/9

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.