ऋतुराज गायकवाडचा पराक्रम! नोंदवला विराट, रोहित, लोकेश यांना मागे टाकणारा विक्रम

IND vs AUS 4rth T20I Live : भारतीय संघ २-१ अशी आघाडी घेऊन ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या ट्वेंटी-२० सामन्यात मैदानावर उतरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 07:41 PM2023-12-01T19:41:18+5:302023-12-01T19:41:51+5:30

whatsapp join usJoin us
IND vs AUS 4rth T20I Live : Ruturaj Gaikwad becomes the fastest Indian to complete 4000 runs in T20I, Yashasvi Jaiswal dismissed for 37(28)  | ऋतुराज गायकवाडचा पराक्रम! नोंदवला विराट, रोहित, लोकेश यांना मागे टाकणारा विक्रम

ऋतुराज गायकवाडचा पराक्रम! नोंदवला विराट, रोहित, लोकेश यांना मागे टाकणारा विक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs AUS 4rth T20I Live : भारतीय संघ २-१ अशी आघाडी घेऊन ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या ट्वेंटी-२० सामन्यात मैदानावर उतरला. यशस्वी जैस्वालने आक्रमक सुरुवात करून देताना ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकात यशस्वीची विकेट पडली, परंतु ऋतुराजने सातवी धाव घेऊ मोठ्या विक्रमाची नोंद केली. 


चौथ्या ट्वेंटी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघातही आज ४ बदल पाहायला मिळाले आहेत. वर्ल्ड कप गाजवणारा श्रेयस अय्यर आज परतला आहे. त्याच्याशिवाय मुकेश कुमार, दीपक चहर व जितेश शर्मा आज प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळत आहेत. आरोन हार्डीच्या पहिल्याच षटकात यशस्वी जैस्वालसाठी LBW चे अपील, परंतु चेंडू पिचिंग आऊटसाईड लेग असल्याने ऑस्ट्रेलियाचा DRS वाया गेला. जैस्वालने त्यानंतर हात मोकळे केले, पहिल्या ३ षटकांत ऋतुराज गायकवाडला एकही चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाही.  यशस्वी  व ऋतुराज यांनी ३५ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. यशस्वी २८ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ३७ धावांवर झेलबाद झाला, हार्डीने सहाव्या षटकात ही विकेट मिळवली. 

वर्ल्ड कप गाजवणाऱ्या श्रेयस अय्यरचे आज ट्वेंटी-२० संघात आगमन झाले, पंरतु तनवीर संघाने त्याला ८ धावांवर माघारी पाठवले. मागील सामन्यात १२३ धावांची खेळी करून ऋतुराजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ट्वेंटी-२०तील सर्वोत्तम वैयक्तिक खेळीची नोंद केली होती. त्याने ब्रेंडन मॅक्युलमचा २०१० मधील नाबाद ११६ धावांचा विक्रम मोडला होता. आज त्याने विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल यांना मागे टाकणारा विक्रम मोडला. ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये सर्वात वेगवान ४००० धावा करणारा तो पहिला भारतीय ठरला. त्याने ११६ इनिंग्जमध्ये हा पराक्रम करून राहुलला ( ११७) मागे टाकले.

ट्वेंटी-२०त ख्रिस गेलने १०७ इनिंग्जमध्ये हा टप्पा गाठला आहे. त्यानंतर शॉन मार्श ( ११३), बाबर आजम ( ११५), डेव्हॉन कॉनवे ( ११६) यांचा क्रमांक येतो.  ऋतुराजच्या नावावर आजच्या लढतीपूर्वी ११५ इनिंग्जमध्ये ३९९३ धावा होत्या. 


भारतीय संघ - ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, जितेश शर्मा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, अक्षर पटेल, दीपक चहर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार.  


ऑस्ट्रेलियाचा संघ - जोश फिलिप्स, ट्रॅव्हिस हेड, बेन मॅकडेर्मोट, आरोन हार्डी, टीम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, मॅथ्यू वेड, ख्रिस ग्रीन, बेन डॉर्शूस, जेसन बेहरेनडॉर्फ, तनवीर संघा 

Web Title: IND vs AUS 4rth T20I Live : Ruturaj Gaikwad becomes the fastest Indian to complete 4000 runs in T20I, Yashasvi Jaiswal dismissed for 37(28) 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.