Join us  

Pm Modi toss at IND vs AUS 4th Test: Rohit Sharma किंवा स्टीव्ह स्मिथ नव्हे, पंतप्रधान मोदी उडवणार टॉस, मॅचची कॉमेंट्रीही करणार?

चौथी कसोटी जिंकणं भारतासाठी अधिक महत्त्वाचं...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2023 7:53 PM

Open in App

PM Modi, Toss at IND vs AUS 4th Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा चौथा आणि शेवटचा कसोटी सामना 9 मार्चपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी (Narendra Modi) स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोघांसाठी खूप खास असेल, कारण भारताने (Team India) हा सामना जिंकल्यास संघ मालिकाही जिंकेल आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम (WTC Final) फेरीतही जाईल. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने (Australia) जर सामना जिंकला तर सलग तिसऱ्यांदा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) गमावण्याची त्यांच्यावरील नामुष्की टळेल. पण या सगळ्याव्यतिरिक्त एका खास गोष्टीमुळे हा सामना क्रिकेटपटू आणि चाहत्यांसाठीही ऐतिहासिक ठरणार आहे. ते कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या सामन्यात टॉससाठी उपस्थित राहणार आहेत.

मोदी टॉसही उडवणार अन् कॉमेंट्रीही करणार...

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 9 मार्चपासून सुरू होणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलियाच्या शेवटच्या कसोटी सामन्याची नाणेफेक रोहित शर्मा किंवा स्टीव्ह स्मिथ करणार नसून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करू शकतात. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असे दावे केले जात आहेत. कारण ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान सध्या भारत दौऱ्यावर आहेत. ते 8 ते 11 मार्च दरम्यान भारतात असतील आणि त्यामुळे 9 मार्च रोजी दोन्ही देशांचे पंतप्रधान भारत-ऑस्ट्रेलिया सामना पाहण्यासाठी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमला ​​भेट देणार आहेत. अशा परिस्थितीत पीएम मोदी कॉमेंट्री बॉक्समध्ये कॉमेंट्रीही करताना दिसू शकतात अशाही बातम्या येत आहेत. मात्र सध्याच्या घडीला ताज्या रिपोर्टनुसार पीएम मोदी मैदानावर नाणेफेकू करू शकतात असे सांगितले जात आहे. आता पीएम मोदी खरोखरच गुरुवारी असे करतात की नाही हे पाहावे लागेल.

दरम्यान, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीबद्दल बोलायचे झाले तर या मालिकेत भारत २-१ ने पुढे आहे. या मालिकेतील पहिला आणि दुसरा सामना भारताने जिंकला असला तरी तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दमदार पुनरागमन केले. आता अहमदाबादची म्हणजेच चौथ्या कसोटी सामन्याची पाळी आहे. भारताला स्वबळावर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जायचे असेल तर या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवून कसोटी मालिका जिंकावी लागेल.

त्याचबरोबर या मालिकेतील आतापर्यंतचे सर्व सामने अवघ्या 3 दिवसात संपले आहेत. आता शेवटचा सामनाही ३ दिवसांत संपतो की पाचव्या दिवसापर्यंत प्रेक्षकांना या सामन्याचा आनंद लुटण्याची संधी मिळणार हे पाहावे लागेल.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियानरेंद्र मोदीरोहित शर्मास्टीव्हन स्मिथभारतीय क्रिकेट संघ
Open in App