ठळक मुद्देभारत-ऑस्ट्रेलिया चौथी कसोटी सिडनीत 3 जानेवारीपासूनदुखापतग्रस्त आर अश्विनला संघात स्थानलोकेश राहुल IN आणि इशांत शर्मा OUT
सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेणाऱ्या भारतीय संघाने चौथ्या सामन्यासाठी 13 सदस्यांचा संघ जाहीर केला. उमेश यादव, कुलदीप यादव आणि आर अश्विन यांचा या चमूत समावेश करण्यात आला आहे. हे तिघेही मेलबर्न कसोटीत खेळले नव्हते. सिडनीची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी पोषक असल्याने कुलदीपला अंतिम अकरात संधी मिळण्याची शक्यता आहे. अश्विन अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. या संघात लोकेश राहुलला पुन्हा स्थाम दिल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. रोहित शर्मा मुंबईत परतल्यामुळे राहुलचा समावेश करण्यात आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे राहुलपेक्षा चांगली कामगिरी करणाऱ्या मुरली विजयला बाकावर बसवण्यात आले आहे. इशांत शर्माचे नाव या यादीत नाही. त्याच्या अनुपस्थितीत उमेश तिसऱ्या जलदगती गोलंदाजाची उणीव भरून काढेल. दुखापतीतून सावरलेल्या हार्दिक पांड्याला संघात स्थान देण्यात आलेले नाही.
अश्विनबाबतचा निर्णय गुरुवारी सकाळी सामन्यापूर्वी घेण्यात येणार असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले. अश्विनचे चौथ्या कसोटीत खेळणे अशक्यच मानले जात आहे. भारताचा 13 जणांचा चमू : विराट कोहली, अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, आर अश्विन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, उमेश यादव.