India vs Australia, 4th Test : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातली नागपूर कसोटी तीन दिवसांत संपली, दिल्लीतील सामनाही तीन दिवसांत आणि इंदूरचा सामनाही तीन दिवसांत संपला. आतापर्यंत बॉर्डर-गावस्कर मालिकेत हेच पाहायला मिळाले आहे. याचे सर्वात मोठे कारण फिरकीपटूंना साथ देणारी खेळपट्टी, हे सांगितले जात आहे. केवळ ऑस्ट्रेलियाच नाही तर भारतीय फलंदाजही फिरकीपटूंसमोर ढेपाळताना दिसले. अशा खेळपट्टींमुळे आता चर्चा तर होणारच. भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आपल्या एका उत्तराने खेळपट्टीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
क्रिकेटपटूची 'पत्नी' यापलिकडे आहे 'तिची' स्वतःची 'ओळख'; कुणी डॉक्टर, कुणी टेनिसपटू तर कुणी अभिनेत्री
राहुल द्रविडने स्पष्टपणे सांगितले की, ''सध्याच्या मालिकेत फिरकीसाठी अनुकूल विकेट बनण्यास मला कोणतीही शंका नाही. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील गुण महत्त्वाचे आहेत आणि त्यामुळेच बहुतांश देश निकाल देणाऱ्या खेळपट्ट्या तयार करतात.'' चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या २-१ ने पुढे आहे. आयसीसीचे सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील विकेट खराब असल्याचे घोषित केल्यानंतर, टर्न-टेकिंग विकेट्सच्या तयारीची चर्चा सुरू झाली आहे.
द्रविडने नागपूर, दिल्ली आणि इंदूरच्या विकेट्सचा बचाव केला आणि म्हणाला, 'मी या प्रकरणात जास्त तपशीलात जाणार नाही. सामनाधिकारी त्यांचे मत व्यक्त करण्यास मोकळे आहेत. मी त्याच्या मतांशी सहमत आहे की नाही हे महत्त्वाचे नाही. माझे मत काय आहे हे महत्त्वाचे नाही. पण जेव्हा WTCचे गुण धोक्यात असतात तेव्हा तुम्हाला अशा विकेटवर खेळावे लागते ज्यामुळे निकाल मिळतो.अशा परिस्थितीत फलंदाजांना अशा खेळपट्टीवर खेळण्याचा मार्ग शोधावा लागतो.
तो म्हणाला, ''असे केवळ भारतातच नाही तर जगभरात घडत आहे. आम्ही जेव्हा परदेश दौऱ्यावर जातो तेव्हा आम्हाला आव्हानात्मक विकेट्सवर खेळावे लागते. आम्ही अलीकडेच दक्षिण आफ्रिकेत खेळलो जिथे फिरकीपटूंनी चांगली कामगिरी केली नाही. प्रत्येकाला अशा विकेट्स तयार करायच्या असतात जिथे निकाल लागेल.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"