ठळक मुद्देभारतीय संघाने 72 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला.भारताने 2-1 ने ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत नमवले
सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाने 72 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. सिडनी कसोटीच्या पाचव्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेल्याने सामना अनिर्णीत राहिला आणि भारताने 2-1 अशा फरकाने मालिका जिंकली. चौथ्या दिवसाचे शेवटचे सत्र आणि पाचव्या दिवसाच्या खेळावर पावसाने पाणी फिरवलं. भारताने यजमान ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन देत ऐतिहासिक मालिका विजयाच्या दिशेनं मोठं पाऊल टाकलंच होतं, परंतु त्यांना हा विजयाचा आनंद मैदानावर साजरा करायचा होता. पावसाने ती संधी हिरावून घेतली असली तरी भारतीय खेळाडूंनी ऐतिहासिक विजय दणक्यात साजरा केला.
भारतीय संघाने ॲडलेड व मेलबर्न कसोटी जिंकून मालिकेत आघाडी घेतली होती. सिडनी कसोटीत भारताने पहिल्या डावातच 622 धावांचा डोंगर उभा केला.
चेतेश्वर पुजारा ( 193 ) आणि रिषभ पंत ( 159* ) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने पहिला डाव 7 बाद 622 धावांवर घोषित केला. ऑसींकडून दर्जेदार खेळ झाला नाही. त्यांचा पहिला डाव 300 धावांवर गडगडला. कुलदीप यादवने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या. भारताने ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन देत आपला मालिका विजय पक्का केला. चौथ्या दिवशी बिनबाद 6 धावांवर असताना खेळ थांबला. सोमवारी पाऊस कायम राहिल्याने खेळ झाला नाही. त्यानंतर पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी मैदानावर जमलेल्या भारतीय संघाने स्टेडियमला प्रदक्षिणा घातली आणि चाहत्यांचे आभार मानले.
Web Title: IND vs AUS 4th Test: Indian players celebrate after winning series, watch video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.