Join us  

Ind vs Aus 4th test: पुजाराचे द्विशतक हुकले, पण द्रविडचा विक्रम काढला मोडीत

पुजाराने 193 धावा फटकावत भारताचा माजी महान फलंदाज राहुल द्रविडला पिछाडीवर टाकले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2019 12:01 PM

Open in App

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : चेतेश्वर पुजाराने चौथ्या कसोटी सामन्यात नेत्रदीपक फलंदाजी केली. या सामन्यात पुजाराचे द्विशतक फक्त सात धावांनी हुकले. पण तरीही पुजाराने 193 धावा फटकावत भारताचा माजी महान फलंदाज राहुल द्रविडला पिछाडीवर टाकले आहे.

भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात पहिला डाव 7 बाद 622 या धावसंख्येवर घोषित केला आहे. चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंत यांच्या दीडशतकाच्या जोरावर भारताला ही दमदार मजल मारता आली. चेतेश्वर पुजाराने आपल्या खास शैलीत आजही दमदार फलंदाजी केली, पण त्याला द्विशतक झळकावता आले नाही. नॅथन लियॉनच्या गोलंदाजीवर पुजारा बाद झाला आणि भारतीय चाहते थोडेसे निराश झाले. पुजाराने तब्बल 22 चौकारांच्या जोरावर 193 धावा केल्या.

 

पुजारा हा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात सर्वात जास्त चेंडू खेळणारा फलंदाज ठरला आहे. या दौऱ्यात सर्वाधिक धावा पुजाराच्या नावावरच आहेत. त्याचबरोबर या दौऱ्यात आतापर्यंत 1258 चेंडू पुजाराने खेळले आहेत. यापूर्वी हा विक्रम द्रविडच्या नावावर होता. द्रविडने 2003-04 साली ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यामध्ये 1203 चेंडू खेळले होते. द्रविडच्यापूर्वी हा विक्रम विजय हजारे यांच्या नावावर होता. हजारे यांनी 1947-48 साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 1192 चेंडू खेळले होते.

 

टॅग्स :चेतेश्वर पुजाराराहूल द्रविडभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया