सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : सिडनी कसोटीत भारतीय संघ इतिहास घडविण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात मालिकेत नमविणारा हा भारताचा पहिलाच संघ ठरणार आहे. ऑस्ट्रेलियातील अपयशाचा इतिहास पुसून टाकण्यासाठी विराटसेना सज्ज झाली आहे. पण, या कसोटीपूर्वी भारतीय संघाला दुखापतग्रस्त खेळाडूंची समस्या सतावत आहे. त्यामुळे संघाच्या या ऐतिहासिक विजयाच्या मार्गात दुखापतीचे सत्र खो तर घालणार नाही, अशी भीती भारतीय चाहत्यांच्या मनात घर करू लागली आहे.
भारतीय संघाने सिडनी कसोटीसाठी बुधवारी 13 सदस्यीय संघ जाहीर केला. या संघात इशांत शर्माचा समावेश नसल्याने अनेकांना आश्चर्य वाटले. संघातील सर्वात अनुभवी जलदगती गोलंदाज इशांत दुखापतीने त्रस्त असल्याचे बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे. त्याजागी संघात उमेश यादवला स्थान देण्यात आले आहे. त्याशिवाय कुलदीप यादव, आर अश्विन आणि लोकेश राहुल यांनीही 13 जणांच्या चमूत स्थान पटकावले आहे. भुवनेश्वर कुमारचे नसणे अनेकांना खटकणारे आहे. त्यात अश्विनची तंदुरूस्ती हा संघासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. अशा परिस्थितीत फिरकीला पोषक असलेल्या सिडनीच्या खेळपट्टीवर कुलदीप व रवींद्र जडेजा यांचे खेळणे निश्चित मानले जात आहे. कर्णधार विराट कोहलीसमोर चौथ्या कसोटीसाठी अंतिम अकरा खेळाडू निवडण्याचा पेच निर्माण झाला आहे. कोहलीने हा पेच सोडवल्यास असा असेल संघ...
सलामीमेलबर्नवर पदार्पणातच मयांक अग्रवालने दमदार कामगिरी करून चौथ्या कसोटीसाठी आपले स्थान पक्के केले. पण, त्याचवेळी प्रथमच सलामीला आलेल्या हनुमा विहारीला मोठी खेळी करता आली नाही, परंतु त्याच्या चिकाटीचे कौतुक झाले. सिडनीसाठीच्या 13 सदस्यांमध्ये लोकेश राहुलचा समावेश करण्यात आल्याने भारतासमोर सलामीली एक पर्यात उपलब्ध झाल आहे. राहुलची कामगिरी निराशाजनकच आहे, परंतु अनुभवाच्या बाबतीत त्याला प्राधान्य मिळू शकते. मधली फळीअॅडलेड आणि मेलबर्न कसोटीतील शतकवीर चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली ही मधली फळी सिडनीतही कायम दिसणार आहे. यष्टिरक्षक म्हणून एकमेव पर्याय असल्याने रिषभ पंत हा सहाव्या स्थानासाठी उत्तम पर्याय आहे. कन्यारत्न प्राप्तीमुळे मुंबईत परतलेल्या रोहित शर्माच्या जागी हनुमा विहारीला संधी मिळू शकते. फिरकी गोलंदाजअश्विन पूर्णपणे तंदुरुस्त होण्याची शक्यता कमीच आहे. कुलदीप व रवींद्र जडेजा यांचे खेळणे निश्चित मानले जात आहे. जलदगती गोलंदाजमोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमरा या जलद माऱ्यासह भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. असे असतील अंतिम अकरा विराट कोहली, अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा .