Join us  

Ind vs Aus 4th Test: "आम्हाला माहितीय पाचव्या दिवशी...."; शुबमन गिलने सांगितला टीम इंडियाचा उद्याचा प्लॅन

Ind vs Aus 4th Test: तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने तीन गडी गमावत २८९ धावा केल्या आहेत. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 6:22 PM

Open in App

शुबमन गिलच्या शतकाने भारताला चौथ्या कसोटीत चांगल्या स्थितीत आणले आणि त्यात विराट कोहलीच्या अर्धशतकाने भर घातली. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ४८० धावांच्या प्रत्युत्तरात भारताकडूनही सडेतोड उत्तर मिळाले आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने तीन गडी गमावत २८९ धावा केल्या आहेत. 

तिसऱ्या दिवसअखेर विराट कोहली आणि रविंद्र जाडेजा मैदानात आहेत. विराट कोहलीने १२८ चेंडूत ५९ धावा आणि रविंद्र जाडेजा १६ धावांवर नाबाद आहे. टीम इंडिया अजूनही ऑस्ट्रेलियापेक्षा १९१ धावांनी मागे आहे. चौथ्या दिवशी म्हणजेच उद्या भारत आक्रमक फलंदाजी करणार असल्याचे संकेत शुबमन गिलने सामना संपल्यानंतर दिले आहेत. 

दिवसाचा खेळ संपल्यानंतर शुबमन गिलने संवाद साधला. यावेळी इथे शतक झळकावताना खूप छान वाटतं. हे माझे आयपीएलमधील घरचे मैदान आहे आणि येथे काही धावा मिळाल्याने आनंद झाला आहे. खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली होती. खेळपट्टीच्या बाहेर जे काही घडत होते ते खडबडीत क्षेत्र आहे, असं शुबमन गिलने सांगितले. तसेच आम्ही जवळपास ३०० धावांवर तीन बाद आहोत. आम्ही चौथ्या दिवशी मोठी धावसंख्या करण्याचा प्रयत्न करू. पाचव्या दिवशी विकेट आमच्या गोलंदाजांना मदत करू शकते हे कोणाला माहीत आहे, असं शुबमन गिलने यावेळी सांगितले.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ४८० धावांच्या प्रत्युत्तरात भारतानेही चांगली सुरुवात केली. रोहित शर्मा ( ३५) व शुबमन गिल यांनी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. रोहित बाद झाल्यानंतर शुबमनने अनुभवी चेतेश्वर पुजारासह भारताचा डाव सावरताना दुसऱ्या विकेटसाठी २४८ चेंडूंत ११३ धावांची भागीजारी केली. शुबमनने कसोटीतील दुसरे शतक पूर्ण करताना भारताला मजबूत स्थितीत आणले. स्टीव्ह स्मिथच्या चतुर क्षेत्ररक्षणात त्यांना धाव शोधताना संघर्ष करायला लावले. अखेर ९६ चेंडूंनंतर शुबमनने भारताला चौकार मिळवून दिली. त्याने कॅमेरून ग्रीनला दोन खणखणीत चौकार खेचले. त्यानंतर शुबमनने त्याचे शतकही पूर्ण केले. शुबमन २३५ चेंडूंत १२ चौकार व १ षटकारासह १२८ धावांवर बाद झाला. नॅथन लाएनने त्याला LBW केले.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :शुभमन गिलभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
Open in App