Join us

Sunil Gavaskar on Virat Kohli, IND vs AUS: विराट कोहलीच्या दमदार शतकानंतर सुनील गावसकरांचे मोठं विधान, म्हणाले...

विराटने कुटल्या दमदार १८६ धावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 18:53 IST

Open in App

Sunil Gavaskar on Virat Kohli, IND vs AUS 4th Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा चौथा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना अनिर्णित राहिला. पण भारताने कसोटी मालिका २-१ अशा फरकाने जिंकली आणि कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. शेवटच्या कसोटीत टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीने शानदार शतकी खेळी केली. त्याने आठ तासांहून अधिक काळ मैदानावर पाय रोवत १८६ धावा कुटल्या. या दरम्यान, माजी दिग्गज खेळाडू सुनील गावसकर यांनी विराट कोहलीबाबत मोठे वक्तव्य केले.

सुनील गावस्करांनी मांडलं स्पष्ट मत

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटीत विराट कोहलीने शतकाचा दुष्काळ संपवला. विराट कोहलीने ३६४ चेंडूत १८६ धावा केल्या. हे त्याचे नोव्हेंबर २०१९ नंतरचे पहिले शतक आहे. माजी कर्णधार सुनील गावसकर म्हणाले, "विराट कोहलीचे हे शतक फार आवश्यक असे यश नाहीये असं मला वाटतं कारण भारताचा स्टायलिश भारतीय फलंदाज कधीच 'आऊट ऑफ फॉर्म' नव्हता. प्रत्येक महान फलंदाज शतकाबद्दल विचार करतो. शतक ही त्याच्या फॉर्मसाठी खूप महत्त्वाचे असते. गेल्या अडीच वर्षांत कोहली ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता, ती फलंदाजी चांगली होती. फक्त त्याला शतक ठोकता आले नव्हते. पण त्याने सात-आठ अर्धशतके झळकावली होती. त्यामुळे तो आऊट ऑफ फॉर्म आहे असे मला कधी वाटलेच नाही. फक्त त्याची एकच चूक होत होती की तो सारखा एकाच प्रकारे आऊट होत होता. त्यात त्याने सुधारणा केली," असे स्पष्ट मत सुनील गावसकर यांना व्यक्त केले.

विराटचे दुसरे संथ शतक

विराट कोहलीने अहमदाबादमध्ये 241 चेंडूत आपले शतक झळकावले, 2012/13 मालिकेत इंग्लंडविरुद्ध 289 चेंडूत केलेल्या शतकानंतरचे त्याचे हे दुसरे संथ शतक ठरले. गावसकर म्हणाले, 'कसोटी सामन्यात शतक कसे झळकावायचे, याचा हा उत्तम नमुना होता. त्याने थोडी संथ सुरुवात केली, जिथे तो खेळपट्टी आणि गोलंदाजी समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. पण मग सेट झाल्यावर त्याने काही शॉट्स खेळले आणि त्यानंतर आणखी चांगली खेळी केली."

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीसुनील गावसकरभारतीय क्रिकेट संघ
Open in App