Ind vs Aus 4th test: विराट कोहलीचा नवा विश्वविक्रम; सचिन, लारा आणि पॉन्टिंगलाही टाकले मागे

विश्वविक्रम रचताना कोहलीने मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा आणि रिकी पॉन्टिंग या महान फलंदाजांना मागे टाकले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 12:47 PM2019-01-03T12:47:43+5:302019-01-03T12:48:34+5:30

whatsapp join usJoin us
Ind vs Aus 4th test: Virat Kohli's new world record; Sachin, Lara and Ponting are behind kohli | Ind vs Aus 4th test: विराट कोहलीचा नवा विश्वविक्रम; सचिन, लारा आणि पॉन्टिंगलाही टाकले मागे

Ind vs Aus 4th test: विराट कोहलीचा नवा विश्वविक्रम; सचिन, लारा आणि पॉन्टिंगलाही टाकले मागे

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताचा कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात जास्त धावा केल्या नाहीत. पण तरीही कोहलीने एक नवा विश्वविक्रम रचला आहे. हा विश्वविक्रम रचताना कोहलीने मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा आणि रिकी पॉन्टिंग या महान फलंदाजांना मागे टाकले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात 59 चेंडू तीन चौकारांच्या मदतीने 23 धावा केल्या. त्यामुळे कोहलीने या सामन्यात कसा विश्वविक्रम रचला असेल, असा विचार तुम्ही करत असाल. पण या 23 धावांच्या मदतीने कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 19 हजार धावा करण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. कोहलीने या सर्वात जलद 19 हजार धावा करताना सचिनला मागे टाकले आहे. सचिनला सर्वात जलद 19 हजार धावा करण्यासाठी 432 डाव खेळावे लागले होते. पण कोहलीमे 399 डावांमध्येच हाच पराक्रम करून दाखवला आहे.


सर्वात कमी डावांमध्ये 19 हजार आंतरराष्ट्रीय धावा करणारे फलंदाज
399 डाव - विराट कोहली*
432 डाव- सचिन तेंदुलकर
433 डाव-ब्रायन लारा
444 डाव- रिकी पॉन्टिंग
458 डाव -जैक कैलिस

Web Title: Ind vs Aus 4th test: Virat Kohli's new world record; Sachin, Lara and Ponting are behind kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.