Join us  

Ind vs Aus 4th Test: Live सामन्यादरम्यान विराट कोहलीची पेटपूजा; श्रेयस अय्यरलाही केली ऑफर, पाहा व्हिडिओ

Ind vs Aus 4th Test: ऑस्ट्रेलिया फलंदाजी करत असताना विराट कोहलीचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2023 6:23 PM

Open in App

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु कसोटी मालिकेतील (IND vs AUS 4th Test) शेवटचा आणि निर्णायक सामना आजपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु झाला आहे. सामन्यात पहिल्या दिवशीचा खेळ आटोपला असून ऑस्ट्रेलियाचा संघ मजबूत स्थितीत दिसून येत आहे. २५५ धावा कागांरुंनी करत केवळ ४ विकेट्सच गमावले आहेत. उस्मान ख्वाजा शतक ठोकून फलंदाजी करत असून कॅमरुन ग्रीनही चांगल्या लयीत आहे. तर भारताकडून जाडेजा आणि अश्विन प्रत्येकी १ तर शमीने दोन विकेट्स घेतल्या. 

ऑस्ट्रेलियाने अहमदाबाद कसोटीचा पहिला दिवस नावावर ठेवला. सलामीवीर उस्मान ख्वाजा भारतीय गोलंदाजांसमोर शड्डू ठोकून उभा राहिला आहे. आर अश्विन व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवून दिली. मोहम्मद शमीने दोन भन्नाट चेंडूंवर ऑसी फलंदाजांचे त्रिफळे उडवले. मार्नस लाबुशेन व पीटर हँड्सकोम्ब यांना भारतीय गोलंदाजाने त्रिफळाचीत केले. कर्णधार स्टीव्ह स्मिथने अनुभवी खेळी केली आणि कॅमेरून ग्रीनने वन डे स्टाईल फटकेबाजी करताना ऑस्ट्रेलियाची पहिल्या दिवसावरील पकड अधिक मजबूत केली. 

ऑस्ट्रेलिया फलंदाजी करत असताना विराट कोहलीचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये विराट कोहली स्लिपमध्ये उभा असून काहीतरी खाताना दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये विराट कोहली त्याच्या खिशातून चॉकलेट काढतो आणि पटापट खाऊ लागतो. तसेच तो बाजूला उभा असलेल्या श्रेयस अय्यरलाही चॉकलेट खाणार का असं विचारतो. मात्र श्रेयस अय्यर त्याला नकार देतो. मात्र तरीही विराट कोहली ते त्याच्याकडे फेकतो.

दरम्यान कॅमेरून ग्रीन व ख्वाजा यांनी झटपट धावा जोडताना ८० चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. दिवसाचा खेळ संपायला ९ षटकं बाकी असताना रोहितने नवा चेंडू मागवला. पण, शमीच्या एका षटकात ग्रीनने दोन खणखणीत चौकार खेचले. ख्वाजा शतकाच्या उंबरठ्यावर असतानाही संयमानेच खेळत होता, तर ग्रीन चांगले फटके खेचत होता. नव्या चेंडूनंतर विकेट मिळतील असे वाटले होते, परंतु कांगारूंनी ६च्या सरासरीने धावा चोपल्या. पहिल्या दिवसाच्या अखेरच्या षटकात ख्वाजाने त्याचे शतक पूर्ण केले. भारताविरुद्धचे हे त्याचे पहिले शतक ठरले, तर एकंदर १४ वे कसोटी शतक झळकावले. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीसोशल व्हायरल
Open in App