Join us  

Video: अंपायरची तारांबळ! चेंडू चुकवण्यासाठी बाजुला गेला अन् झालं काही तरी भलतंच...

भारताने टी२० मालिका ४-१ ने जिंकली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2023 10:41 AM

Open in App

Umpire hit by ball, Ind vs Aus 5th T20: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी२० मालिकेतील शेवटचा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना भारतीय संघाने जिंकला. अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १० धावांची गरज होती. कर्णधार मॅथ्यू वेड क्रीजवर राहिला. मात्र अर्शदीप सिंगने केवळ तीन धावा देत भारताचा विजय निश्चित केला. पण शेवटच्या षटकात असे काही घडले की ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

अखेरच्या दोन चेंडूत ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ९ धावांची गरज होती. अर्शदीप सिंगच्या चेंडूवर नॅथन एलिसने समोरून जोरदार शॉट खेळला. अंपायरने पटकन चेंडू चुकवायचा प्रयत्न केला, पण चेंडू अर्शदीप सिंगच्या हाताला लागला आणि अंपायर केएन अनंत पद्मनाभन यांच्या अंगावर गेला. त्यांनी वाचण्याचा प्रयत्न केला पण चेंडू त्यांच्या उजव्या पायावर आदळला आणि ते कळवळले.

दरम्यान, अंपायर केएन अनंत पद्मनाभन यांना चेंडू लागल्याने वेदना होत असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. मात्र ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज टीम डेव्हिडला हसू आवरता आले नाही. अंपायर जखमी झाल्यानंतर कॅमेरा थेट टीम डेव्हिडच्या दिशेने गेला. तो सतत हसत होता. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेड त्याच्या शेजारी बसला होता. तो खूप शांत आणि गंभीर बसला होता.

असा रंगला सामना

भारताने रविवारी पाचव्या आणि शेवटच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सहा धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजीला आमंत्रण मिळाल्यानंतर भारताने आठ गडी गमावून 160 धावा केल्या. श्रेयस अय्यरने फलंदाजीसाठी अवघड असलेल्या विकेटवर अर्धशतक झळकावले. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ 8 गड्यांच्या मोबदल्यात 154 धावाच करू शकला. भारताकडून मुकेश कुमारने सर्वाधिक तीन बळी घेतले. बेन मॅकडरमॉटने ५ षटकारांच्या मदतीने अर्धशतक झळकावले.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाअर्शदीप सिंगभारतआॅस्ट्रेलियासोशल मीडिया