IND vs AUS 5th T20I Live : भारतीय संघाला पाचव्या ट्वेंटी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध श्रेयस अय्यरच्या फिफ्टीच्या जोराव तगडे आव्हान उभे करता आले. श्रेयस अय्यरने अखेरच्या षटकांत जोरदार फटकेबाजी केली. यशस्वी जैस्वाल, जितेश शर्मा आणि अक्षर पटेल यांनी उपयुक्त खेळी केली. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी आज चांगली कामगिरी केली.
यशस्वी जैस्वालने १५ चेंडूंत २१ धावांची वादळी खेळी करून भारताला दमदार सुरुवात करून दिली. जेसन बेहरेनडॉर्फने टाकलेल्या चौथ्या षटकात त्याला बाद केले. पाचव्या षटकात ऋतुराज गायकवाड ( १०) बेन ड्वॉरशूईसच्या गोलंदाजीवर सोपा झेल देऊन परतला. सूर्यकुमार यादवला भोपळ्यावर जीवदान मिळाले, परंतु त्याचा भारताला फार काळ फायदा झाला नाही. ड्वॉरशूईसच्या गोलंदाजीवर सूर्या ( ५) पॉईंटलाच मॅकडेर्मोटच्या हाती झेल देऊन परतला. बिनबाद ३३ वरून भारताची अवस्था ३ बाद ४६ अशी झाली. तनवीर संघाने त्याच्या फिरकीची जादू दाखवली. रिंकू सिंग ६ धावांवर आज झेलबाद झाला.
जितेश शर्मा व श्रेयस अय्यर यांनी २४ चेंडूंत ४२ धावांची भागीदारी केली, परंतु आरोन हार्डीने ही सेट जोडी तोडली. तिलक १६ चेंडूंत २४ धावा करून माघारी परतला. श्रेयस एका बाजूने खेळपट्टीवर उभा राहिला होता आणि भारताला मोठी धावसंख्या उभारून देण्याची जबाबदारी त्याच्याच खांद्यावर होती. अक्षर पटेलची ( ३१) त्याला उत्तम साथ लाभली आणि ४६ धावा जोडल्या. श्रेयसने ३६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. तो ३७ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५३ धावांवर बाद झाला. भारताने ८ बाद १६० धावा केल्या.
Web Title: IND vs AUS 5th T20I Live : FIFTY BY SHREYAS IYER ( 53(37), 4s-5 6s-2), India posted 160 for 8 from 20 overs in the 5th T20I.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.