IND vs AUS 5th T20I Live : भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. आजचा पाचवा सामना हा केवळ औपचारिक राहिला आहे. ऑस्ट्रेलियाने पुन्हा नाणेफेक जिंकली आणि त्यांनी गोलंदाजीचा निर्णय घेतला. दीपक चहर वैद्यकीय इमरजन्सीमुळे तातडीने घरी परतल्याचे सूर्यकुमार यादने सांगितले. त्याच्या जागी अर्शदीप सिंग खेळणार आहे. यशस्वी जैस्वालने आक्रमक सुरुवात करून दिली, ऋतुराज गायकवाडने विक्रमाची नोंद केली. पण, सूर्यकुमार यादवने लगेच विकेट फेकली अन् १३ धावांत भारताचे ३ फलंदाज माघारी परतले.
यशस्वी जैस्वालने १५ चेंडूंत २१ धावांची वादळी खेळी करून भारताला दमदार सुरुवात करून दिली. जेसन बेहरेनडॉर्फने टाकलेल्या चौथ्या षटकात नॅथन एलिसने उत्तुंग उडालेला चेंडू अचूक टिपला. पाचव्या षटकात ऋतुराज गायकवाड ( १०) बेन ड्वॉरशूईसच्या गोलंदाजीवर बेहरेनडॉर्फच्या हाती सोपा झेल देऊन परतला. द्विदेशीय ट्वेंटी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये ऋतुराजने ( २२३) तिसरे स्थान पटकावले. विराट कोहली ( २३१ वि. इंग्लंड २०२१) आणि लोकेश राहुल ( २२४ वि. न्यूझीलंड, २०२०) हे आघाडीवर आहेत. पण, ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकाच ट्वेंटी-२० मालिकेत सर्वाधिक २१८ धावांचा मार्टीन गुप्तीलचा विक्रम ऋतुराजने मोडला.
सूर्यकुमार यादवला भोपळ्यावर जीवदान मिळाले, परंतु त्याचा भारताला फार काळ फायदा झाला नाही. ड्वॉरशूईसच्या गोलंदाजीवर सूर्या ( ५) पॉईंटलाच मॅकडेर्मोटच्या हाती झेल देऊन परतला. बिनबाद ३३ वरून भारताची अवस्था ३ बाद ४६ अशी झाली.
Web Title: IND vs AUS 5th T20I Live : Ruturaj Gaikwad has scored most runs against Australia in a T20I bilateral series in history, india loss 3 wickets in 46 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.