IND vs AUS : ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी वाढली! ६ दिवसांत मालिका गमावली ८ खेळाडूंनी घरची वाट धरली

भारताने नागपूर पाठोपाठ दिल्ली कसोटीही तीन दिवसांच्या आत जिंकली आणि २-० अशी आघाडी घेताना बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्वतः जवळ कायम राखली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 11:45 AM2023-02-22T11:45:46+5:302023-02-22T11:46:14+5:30

whatsapp join usJoin us
IND vs AUS: 8 Australian players of Test Team RETURN HOME after losing Border Gavaskar Trophy in 6 days, Ashton Agar & Matt Renshaw also joins  | IND vs AUS : ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी वाढली! ६ दिवसांत मालिका गमावली ८ खेळाडूंनी घरची वाट धरली

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी वाढली! ६ दिवसांत मालिका गमावली ८ खेळाडूंनी घरची वाट धरली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Australia : भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने ६ दिवसांत बॉर्डर-गावस्कर मालिका गमावली. भारताने नागपूर पाठोपाठ दिल्ली कसोटीही तीन दिवसांच्या आत जिंकली आणि २-० अशी आघाडी घेताना बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्वतः जवळ कायम राखली. भारताने सलग चौथ्यांदा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला. यानंतर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू एकामागून एक मायदेशी परतत आहे. कुणी दुखापतीमुळे तर कुणी कौटुंबिक कारणामुळे असे ८ खेळाडू मायदेशाच्या दिशेने रवाना झाले आहेत आणि आता कांगारूंना उर्वरित खेळाडूंसह दोन कसोटींत खिंड लढवावी लागणार आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स कालच कौटुंबिक कारणामुळे मायदेशात परतला, त्याच्यासोबत जोश हेझलवूड आणि डेव्हिड वॉर्नर ( दुखापतग्रस्त) हेही होते. आता त्यात आज मॅट रेनशॉ व ॲस्टन ॲगर हेही मायदेशाच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे.

कोण कोण मायदेशाच्या दिशेने  ?
पॅट कमिन्स ( कुटुंबातील सदस्य आजारी असल्यामुळे)
डेव्हिड वॉर्नर ( कोपऱ्याची दुखापत)
ॲश्टन ॲगर  
जोश हेझलवूड
टॉड मर्फी
मिचेल स्वेपसन   
लान्स मॉरिस
मॅथ्यू रेनशॉ  

या मालिकेतून कसोटीत पदार्पण करणाऱ्या टॉड मर्फीलाही दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली आहे. त्याने पहिल्याच कसोटीत ७ विकेट्स घेत प्रभाव पाडला होता. मिचेल स्वेपसन आधीच ऑस्ट्रेलियात गेला आहे.  जलदगती गोलंदाज लान्स मॉरिस हा शेफिल्ड शिल्ड खेळतोय, परंतु मिचेल स्टार्क व कॅमेरून ग्रीन हे पुर्णपणे तंदुरूस्त झाले आहेत.  ऑस्ट्रेलिया १९ खेळाडूंसह भारत दौऱ्यावर आले होते आणि त्यापैकी ८ जणं आता मायदेशात परतले आहेत.

ऑस्ट्रेलियाचा संघ - पॅट कमिन्स ( कर्णधार), ॲश्टन ॲगर, स्कॉट बोलंड, ॲलेक्स केरी, कॅमेरून ग्रीन, पीटर हँड्सकोम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हीस हेड, उस्मान ख्वाजा, मॅट कुहनेमन, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेपसन, डेव्हिड वॉर्नर ( Australia squad: Pat Cummins (c), Ashton Agar, Scott Boland, Alex Carey, Cameron Green, Peter Handscomb, Josh Hazlewood, Travis Head, Usman Khawaja, Matt Kuhnemann, Marnus Labuschagne, Nathan Lyon, Lance Morris, Todd Murphy, Matthew Renshaw, Steve Smith (vc), Mitchell Starc, Mitchell Swepson, David Warner) 

  • तिसरी कसोटी इंदूर : १ मार्चपासून सुरू होईल
  • चौथी कसोटी अहमदाबाद – ९ ते १३ मार्च.

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: IND vs AUS: 8 Australian players of Test Team RETURN HOME after losing Border Gavaskar Trophy in 6 days, Ashton Agar & Matt Renshaw also joins 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.