IND vs AUS : अश्विन ठरेल भारतासाठी ट्रम्पकार्ड, सांगतोय चेतेश्वर पुजारा; पाहा हा व्हिडीओ

आज भारताची पहिली पत्रकार परीषद झाली. यामध्ये आर. अश्विन हा भारतासाठी ट्रम्प कार्ड ठरेल, असे मत भारताचा क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराने व्यक्त केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 02:48 PM2018-12-03T14:48:49+5:302018-12-03T14:50:37+5:30

whatsapp join usJoin us
IND vs AUS: Ashwin will be the Trumpcard for India, Cheteshwar Pujara speaking. Watch this video | IND vs AUS : अश्विन ठरेल भारतासाठी ट्रम्पकार्ड, सांगतोय चेतेश्वर पुजारा; पाहा हा व्हिडीओ

IND vs AUS : अश्विन ठरेल भारतासाठी ट्रम्पकार्ड, सांगतोय चेतेश्वर पुजारा; पाहा हा व्हिडीओ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देअश्विन हा अनुभवी फिरकीपटू आहे. अश्विनने इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेटमध्येही गोलंदाजी केली आहे.फलंदाजाला ओळखण्यात तो माहिर आहे.

अॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाः भारतीय संघ पहिल्या कसोटी सामन्यासाठी सज्ज झाला आहे. अॅडलेडला भारतीय संघ दाखल झाला असून त्यांनी सराव करायलाही सुरुवात केली आहे. आज भारताची पहिली पत्रकार परीषद झाली. यामध्ये आर. अश्विन हा भारतासाठी ट्रम्प कार्ड ठरेल, असे मत भारताचा क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराने व्यक्त केले आहे.

पुजारा म्हणाला की, " अश्विन हा आमचा अनुभवी फिरकीपटू आहे. यापूर्वी झालेल्या दौऱ्यात तो भारतीय संघाचा एक भाग होता. त्यामुळे त्याला येथील वातावरणाचा चांगलाच अंदाज आहे. त्याचबरोबर अश्विनने इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेटमध्येही गोलंदाजी केली आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे वातावरण व खेळपट्ट्या सारख्या असतात. या दोन्ही देशांमध्ये फिरकी गोलंदाजीला जास्त वाव मिळत नाही. पण अश्विननने इंग्लंडमध्ये बराच काळ गोलंदाजी केल्याचा फायदा त्याला नक्कीच या दौऱ्यात होईल. त्याचबरोबर फलंदाजाला ओळखण्यात तो माहिर आहे." 


भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी अॅडलेड येथे दाखल झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी 6 ते 10 डिसेंबर या कालावधीत अॅडलेड ओव्हल येथे खेळवण्यात येणार आहे. ट्वेंटी-20 मालिकेतील बरोबरीनंतर भारतीय संघ सराव सामन्यासाठी सिडनीतच मुक्कामाला होता.

अॅडलेड कसोटीनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सामना पर्थ येथे 14 डिसेंबरपासून खेळवण्यात येईल. तिसरा आणि चौथा सामना अनुक्रमे मेलबर्न व सिडनी येथे 26 डिसेंबर आणि 3 जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यानंतर तीन सामन्यांची वन डे मालिका होणार आहे. हे सामने अनुक्रमे सिडनी, अॅडलेड आणि मेलबर्न येथे जानेवारी महिन्यात होतील. कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच भारताला धक्का बसला आहे. सराव सामन्यात भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉ याला दुखापत झाली असून तो पहिल्या सामन्यात खेळणार नाही. 

भारत आर्मीला दिली जडेजा आणि भुवनेश्वरने भेट
प्रत्येक संघाचे चाहते असतात. सामाना सुरु असताना हे चाहते खेळाडूंना प्रोत्साहन देत असतात. इंग्लंडची बार्मी-आर्मी ही इंग्लंडची चाहत्यांची टीम प्रत्येक ठिकाणी जाऊन खेळाडूंना प्रोत्साहन देत असते. आता भारताचीही अशीच एक आर्मी तयार झाली आहे. भारत आर्मी, असे तिचे नाव. भारत आर्मी अॅडलेडला येऊन धडकली आहे. या आर्मीला संघातील रवींद्र जडेजा आणि भुवनेश्वर कुमार यांनी भेट दिली.

Web Title: IND vs AUS: Ashwin will be the Trumpcard for India, Cheteshwar Pujara speaking. Watch this video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.