Join us

IND vs AUS : सेमीत टीम इंडियाला भिडण्याआधी ऑस्ट्रेलियानं बदलला संघ; या खेळाडूवर खेळलाय डाव

टीम इंडियाविरुद्धच्या सेमीआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, यातून सावरण्यासाठी कांगारुंनी खेळला मोठा डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 11:33 IST

Open in App

Champions Trophy 2025, IND vs AUS Semi Final : भारतीय संघानं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडला रोखत विजयाची हॅटट्रिक नोंदवली. या निकालासह सेमी फायनलमध्ये कोण कुणाला भिडणार हे चित्र स्पष्ट झाले आहे. मंगळवारी,  ४ मार्चला भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला सेमी फायनल सामना दुबईच्या मैदानात रंगणार आहे. दुसरीकडे बुधवारी ५ मार्चला लाहोरच्या मैदानात दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दुसरा सेमीफायनल सामना खेळवला जाईल. या दोन्ही सामन्यातील विजेता संघ जेतेपदासाठी ९ मार्चला फायनल खेळेल. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

सेमीचं समीकरण सेट, आता फायनलचं गणितही भारतीय संघाच्या हाती

फायनल लढत दुबईत होणार की, पाकिस्तानात त्याचा फैसलाही भारतीय संघाच्या हातात आहे. जर भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाला शह दिला तर दुसऱ्या सेमीफायनलमधील विजेत्या संघाला दुबईची फायनल खेळण्यासाठी पाकिस्तानहून दुबईची फ्लाइट पकडावी लागेल. सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला भिडण्याआधी ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसलाय. यातून सावरण्यासाठी संघानं एक मोठा डाव खेळत सेमी आधी संघात बदल केला आहे.

सेमीआधी ऑस्ट्रेलिया संघाला धक्का, संघात बदल करण्याची वेळ

ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यातील स्फोटक सलामावीर मॅथ्यू शॉर्ट अफगाणिस्तान विरुद्धच्या लढतीत दुखापतग्रस्त झाला होता. दुखापतीमुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे. सेमीआधी ऑस्ट्रेलियन संघाला हा मोठा धक्का आहे. त्याची उणीव भरून काढण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघानं बदली खेळाडूसह संघात मोठा बदल केला आहे.

कांगारुंच्या ताफ्यात धडाकेबाज ऑलराउंडरची एन्ट्री

ऑस्ट्रेलियन संघानं भारतीय संघाविरुद्धच्या सेमी फायनल आधी मॅथ्यू शॉर्टच्या जागी बदली खेळाडूच्या रुपा ऑलराउंडर कूपर कॉनोली (Cooper Connolly) या अष्टपैलू खेळाडूला संघात स्थान दिले आहे. या २४ वर्षी खेळाडूनं आतापर्यंत ऑस्ट्रेलियाकडून ६ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात ३ वनडेचा समावेश आहे. तो एक मध्यफळतील फलंदाज असून ऑफ स्पिन गोलंदाजीही करतो. भारतीय संघाविरुद्ध अतिरिक्त फिरकीपटूचा वापर करता येईल, याच हेतून ऑस्ट्रेलियानं त्याच्यावर डाव खेळल्याचे दिसते. 

वनडे वर्ल्डचा बदला मिनी वर्ल्ड स्पर्धेत घेण्याच्या इराद्याने उतरेल टीम इंडिया  

ऑस्ट्रेलियन संघ १६ वर्षांनी पहिल्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या नॉकआउट फेरीत पोहचला आहे. कांगारुंच्या संघानं २००९ मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली होती. यंदाच्या हंगामात फायनल गाठण्यासाठी कांगारुंसमोर टीम इंडियाचे कडवे आव्हान आहे. भारतीय संघ वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील पराभवाची परतफेड करून मिनी वर्ल्ड कपमधून ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

ऑस्‍ट्रेलियन संघ-

स्टीव स्मिथ (कर्णधार), सीन एबॉट, ॲलेक्स कॅरी, बेन ड्वार्शुइस, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, ॲरन हार्डी, ट्रॅविस हेड, जोस इंग्लिस, स्पेंसर जॉनसन, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर सांघा, कूपर कॉनोली, ॲडम झम्‍पा.

टॅग्स :चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५स्टीव्हन स्मिथभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलिया