IND vs AUS : भारताचा कसोटी संघाचा उप कर्णधार कोण? रोहित शर्मा ठरवणार; KL Rahulच्या गच्छंतीनंतर तीन नावं शर्यतीत 

India Squad Australia Test: IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी आणि आगामी वन डे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा बीसीसीआयने रविवारी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 10:23 AM2023-02-20T10:23:33+5:302023-02-20T10:24:34+5:30

whatsapp join usJoin us
IND vs AUS : BCCI hands Rohit Sharma power to pick new VICE-CAPTAIN after dropping KL Rahul, Pujara, Ashwin & Jadeja is in race  | IND vs AUS : भारताचा कसोटी संघाचा उप कर्णधार कोण? रोहित शर्मा ठरवणार; KL Rahulच्या गच्छंतीनंतर तीन नावं शर्यतीत 

IND vs AUS : भारताचा कसोटी संघाचा उप कर्णधार कोण? रोहित शर्मा ठरवणार; KL Rahulच्या गच्छंतीनंतर तीन नावं शर्यतीत 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India Squad Australia Test: IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी आणि आगामी वन डे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा बीसीसीआयने रविवारी केली. लोकेश राहुलचा ( KL Rahul) फॉर्म पाहता त्याची गच्छंती होईल असा अंदाज व्यक्त केला गेला होता. पण, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व कर्णधार रोहित शर्मा त्याच्यामागे ठामपणे उभे राहिले अन् लोकेश राहुलने संघातील स्थान राखले. मात्र, त्याचवेळी बीसीसीआयने उप कर्णधारपद काढून घेऊन त्याला इशारा दिला आहे. परफॉर्म न केल्यास आता खैर नाही, असे सूचक संकेत बीसीसीआयने दिले आहेत. दोन कसोटींसाठी जाहीर झालेल्या संघात उप कर्णधारपद कोणलाच न दिल्याने चाहते संभ्रमात आहेत. 

जसप्रीत बुमराह थेट मुंबई इंडियन्सकडून IPL 2023 मध्ये खेळणार; BCCI बारीक लक्ष ठेवणार


चेतश शर्मा यांच्या राजीनाम्यानंतर शिव सुंदर-दास यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने लोकेश राहुलला उप कर्णधारपदावरून हटवण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी त्यांनी नवा उप कर्णधार निवडण्याचे सर्व अधिकार रोहित शर्माला दिले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भारताने २-० अशी आघाडी घेतली आहे आणि उर्वरित दोन सामन्यांत रोहित कोणाला उप कर्णधार म्हणून निवडतो याची उत्सुकता आहे. या शर्यतीत रवींद्र जडेजा, आर अश्विन व चेतेश्वर पुजारा या तीन नावांची चर्चा सुरू झाली आहे. 

''उप कर्णधार न निवडण्याचा निर्णय आमचा आहे,  परंतु त्याची निवड करण्याचा अधिका रोहित शर्माला दिला गेला आहे. रोहितच्या अनुपस्थितीत मैदानावर नेतृत्व कोण करेल, याचा निर्णय तो घेईल,''असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.   केएल राहुलचं उप कर्णधारपद गेलं अन् आता त्याचे संघातील स्थानही धोक्यात आहे.  अशा परिस्थितीत शुभमन गिल तिसऱ्या कसोटीत संघात परण्याचा अंदाज आहे. मग, रोहित व शुभमन ही जोडी सलामीला खेळताना दिसू शकते. लोकेशने दोन कसोटीत २०, १७ व १ अशा धावा केल्या आहेत. त्याची सरासरी १३.५७ अशी आहे आणि त्यापेक्षा चांगली सरासरी ही आर अश्विन ( ३७) व मोहम्मद शमी ( २१.८०) यांची आहे.   

तिसऱ्या व चौथ्या कसोटीसाठीचा संघ -  रोहित शर्मा, लोकेश राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जयदेव उनाडकट

तिसरी कसोटी - १ मार्चपासून - इंदूर
चौथी कसोटी - ९ मार्चपासून - अहमदाबाद

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: IND vs AUS : BCCI hands Rohit Sharma power to pick new VICE-CAPTAIN after dropping KL Rahul, Pujara, Ashwin & Jadeja is in race 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.