सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : सिडनी येथे सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताचा यष्टिरक्षक रिषभ पंतने दमदार दीडशतक झळकावले. यावेळी पंतला पाठिंबा दिला तो भारत आर्मीने.
मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन आणि पंत यांच्यात तोडीस तोड शेरेबाजी रंगलेली पाहायला मिळाली. पेनच्या 'बेबिसिटिंग' टोमण्याला पंतकडून 'टेम्पररी कर्णधार' असे उत्तर पाहायला मिळाले. त्यांच्या या स्लेजिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनीही उडी घेतली आहे आणि त्याने गमतीशीरपणे स्लेजिंग करताना पंतचे स्वागत केले होते.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेत खेळाडूंमध्ये शेरेबाजीचे प्रकार रंगलेले पाहायला मिळत आहेत. मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन आणि भारताचा यष्टिरक्षक रिषभ पंत यांच्यात तोडीस तोड शेरेबाजी रंगलेली पाहायला मिळाली. पेनच्या 'बेबिसिटिंग' टोमण्याला पंतकडून 'टेम्पररी कर्णधार' असे उत्तर पाहायला मिळाले. त्यांच्या या स्लेजिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनीही उडी घेतली आहे आणि त्याने गमतीशीरपणे स्लेजिंग करताना पंतचे स्वागत केले.
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी कुटुंबीयांसह पंतप्रधान मॉरिसन यांची भेट घेतली. या दरम्यान मॉरिसन यांनी प्रत्येक खेळाडूशी चर्चा केली. अशाच चर्चेदरम्यान मॉरिसन आणि पंत समोरासमोर आले आणि गमतीदार किस्सा घडला. मॉरिसन म्हणाले,''अच्छा! तुम्हीच स्लेजिंग करता ना? तुमचे स्वागत. आम्हाला स्पर्धात्मक खेळ आवडतो.'' मॉरिसन यांच्या या वाक्यानंतर उपस्थित खेळाडूंना हसू आवरले नाही.
भारत आर्मीने त्यानंतर पंतची बाजू चांगलीच लावून धरली. " आमच्याकडे रिषभ पंत आहे. तो तुमच्या गोलंदाजीवर षटकार मारेल, तो तुमच्या मुलांनाही सांभाळेल, असा आमचा रिषभ पंत आहे," असे भारत आर्मी म्हणत होती.
Web Title: Ind vs Aus: Bharat Army came forward to support Rishabh Pant
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.