Join us  

Ind Vs Aus: WTC फायनलपूर्वी ऑस्ट्रेलियाला जबर धक्का, आघाडीचा वेगवान गोलंदाज जोस हेझलवूड जखमी

WTC final: जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना सुरू होण्यास केवळ दोन दिवस उरले असतानाच ऑस्ट्रेलियन संघाला जबर धक्का बसला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2023 7:18 PM

Open in App

भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांमध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना हा ७ जूनपासून खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. मात्र सामना सुरू होण्यास केवळ दोन दिवस उरले असतानाच ऑस्ट्रेलियन संघाला जबर धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज दुखापतग्रस्त झाला असून, तो या अंतिम सामन्याला मुकणार आहे. दरम्यान, हेझलवूडला पर्याय म्हणून मायकेल नेसर याल संघात समाविष्ट करण्यात आलं आहे.

दुखापतग्रस्त जोस हेझलवुडचा पर्यायी खेळाडू म्हणून मायकेल नेसरच्या निवडीला आयसीसीने मान्यता दिली आहे. आयसीसीने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार हेझलवुड दुखापतीशी झुंजत होता. कुठलीही जोखीम नको म्हणून त्याने आयपीएलच्या १६ व्या हंगामातून माघार घेतली होती.

दरम्यान, हेजलवूडला पर्याय म्हणून मायकेल नेसरचा या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघात समाविष्ट करण्यात आलं आहे. आता निवड समिती आणि संघव्यवस्थापनाने स्कॉट बोलँडऐवजी नेसरला प्राधान्य दिल्यास त्याला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळू शकते. मायकल नेसरला संघात समाविष्ट करण्यास वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्याच्या इव्हेंट टेक्निकल कमिटीने दिली आहे. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा
Open in App