ठळक मुद्देप्रत्येकाच्या आक्रमकतेच्या व्याख्या वेगवेगळ्या असतात. माझ्यासाठी आक्रमकता म्हणजे जिंकण्यासाठी काहीही करणे. माझ्यामध्ये आक्रमकता असल्यामुळे मी जिंकण्यासाठी काहीही करू शकतो, असे कोहली म्हणाला.
ब्रिस्बेन, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेचा पहिला सामना बुधवारी गाबा येथे होणार आहे. या सामन्यापूर्वी झालेल्या एका पत्रकार परीषदेमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीने काही विधानं केली आहेत.
आक्रमकता म्हणजे नेमके काय, असा प्रश्न कोहलीला विचारण्यात आला. त्यावर कोहली म्हणाला की, " प्रत्येकाच्या आक्रमकतेच्या व्याख्या वेगवेगळ्या असतात. माझ्यासाठी आक्रमकता म्हणजे जिंकण्यासाठी काहीही करणे. माझ्यामध्ये आक्रमकता असल्यामुळे मी जिंकण्यासाठी काहीही करू शकतो. "
कोहली यावेळी संघाबद्दल म्हणाला की, " आमचा संघ चांगलाच समतोल आहे. संघात युवा खेळाडूंचा भरणा आहे. परदेशी खेळपट्ट्यांवर सक्षमपणे खेळण्यासाठी आम्ही सज्ज आहोत."