IND vs AUS Virat Kohli Breaks Ricky Ponting's Big Record : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील पहिला सेमी फायनल सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात दुबईच्या मैदानता रंगला आहे. टीम इंडियाच्या बॅटिंगची आस असणाऱ्या विराट कोहलीनं या सामन्यात रिकी पाँटिंगचा विक्रम मोडीत काढला. विराट कोहली मैदानात उतरला की, तो कोणता ना कोणता रेकॉर्ड करतोच. यावेळी बॅटिंगला येण्याआधी फिल्डिंग करताना त्याने ऑस्ट्रेलियन माजी कॅप्टनला धोबीपछाड दिलीये. एक नजर टाकुयात कोहलीनं आपल्या नावे केलेल्या खास रेकॉर्डवर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारताकडून सर्वाधिक कॅचेस, पाँटिंगला मागे टाकण्याचाही साधला डाव
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात विराट कोहली भारताकडून सर्वाधिक झेल घेणारा खेळाडू ठरला आहे. आतापर्यंत त्याने ३०१ सामन्यात १६१ झेल टिपले आहेत. या मॅचमध्ये रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर जोश इंग्लिसचा कॅच घेताच त्याने पाँटिंगच्या विक्रमाची बरोबरी केली. त्यानंतर मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर नेथन एलिसचा कॅच पकडताच त्याने ऑस्ट्रेलियन दिग्गजाला मागे टाकले. वनडेत सर्वाधिक कॅचेस पकडणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आता तो पाँटिंगच्या पुढे निघून गेलाय.
वर्ल्ड रेकॉर्ड २०० पारचा; कोहली कितव्या स्थानी माहितीये
वनडे क्रिकेटमध्ये फिल्डरच्या रुपात सर्वाधिक कॅचेस पकडण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड श्रीलंकेच्या मेलि यजवर्धने याच्या नावे आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत २१८ झेल टिपले आहेत. वनडेत २०० पेक्षा अधिक कॅचेस घेणारा तो एकमेव खेळाडू आहे. त्यानंतर आता या यादीत विराट कोहलीचा नंबर लागतो. कोहलीनं ३०१ सामन्यात १६१ कॅच टिपले आहेत. रिकी पाँटिंगच्या नावे १६० कॅचचा रेकॉर्ड आहे. त्याच्या पाठोपाठ या यादीत भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचा नंबर लागतो. त्याने आपल्या वनडे कारकिर्दीत १५६ कॅचेस टिपले आहेत.
वनडेत सर्वाधिक कॅचेस घेणारे क्रिकेटर
- २१८- महेला जयवर्धने
- १६१- विराट कोहली
- १६०- रिकी पाँटिंग
- १५६ - मोहम्मद अझरुद्दीन
- १४२ - रॉस टेलर