India vs Australia T20I Series : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियात दाखल होण्यापूर्वी भारतीय संघ घरच्या मैदनावर वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका या दोन तगड्या संघांचा सामना करणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी खेळाडू मोहालीत पोहोचले आहेत आणि कसून सरावही करत आहेत. या सरावातून वेळ काढत भारतीय खेळाडूंची मज्जामस्तीही सुरू आहेच. २० सप्टेंबरला भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला ट्वेंटी-२० सामना मंगळवारी मोहालीत होणार आहे. विराट कोहलीचा ( Virat Kohli) चा परतलेला फॉर्म हा चाहत्यांना सुखावणार आहे आणि ऑसीविरुद्धच्या मालिकेत तो फॉर्म टिकवतो, का याची उत्सुकता आहे. हार्दिक पांड्याही ( Hardik Pandya) दुखापतीतून सावरल्यानंतर जबरदस्त खेळतोय. पण, आज विराट व हार्दिक वेगळ्याच कारणानं चर्चेत आले आहेत.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात उद्यापासून मालिका सुरू होणार; जाणून घ्या संघ, वेळ व कुठे लाईव्ह पाहाल
भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्या व माजी कर्णधार विराट यांनी 'शाकाबूम' डान्स केला आहे आणि हार्दिकने ती रिल्स सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. काही तासातच त्याला ५० लाखांपर्यंत लाईक्स मिळाले आहेत. मैदानावर विराटला अनेकदा नाचताना पाहिले गेले आहे, परंतु सोशल मीडियासाठी त्याने डान्स रिल्स केलेला पहिलाच प्रयत्न असेल आणि तो लोकांना प्रचंड आवडला आहे.
भारतीय संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह
ऑस्ट्रेलियाचा संघ - सीन एबॉट, अॅश्टन अॅगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, आरोन फिंच, कॅमेरून ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, डॅनिएल सॅम्स, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, अॅडम झम्पा.
वेळापत्रक पहिली ट्वेंटी-२०- २० सप्टेंबर- मोहाली, सायंकाळी ७.३० वा.पासूनदुसरी ट्वेंटी-२० - २३ सप्टेंबर- नागपूर, सायंकाळी ७.३० वा.पासूनतिसरी ट्वेंटी-२० - २५ सप्टेंबर- हैदराबाद, सायंकाळी ७.३० वा.पासून