ठळक मुद्देभारतीय संघ ब्रिस्बेनला दाखल झाला आहे. भारतीय संघ सराव करत असताना पंत आपल्या बॅटवर हातोड्याने प्रहार करत असल्याचे दिसत आहे.पंत असे का करत होता, हे तुम्हाला माहिती आहे का...
ब्रिस्बेन, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : फलंदाजासाठी बॅट हेच सर्वस्व असतं. त्यामुळे बरेच खेळाडू आपली बॅट सांभाळतात. काही वेळा फलंदाज रागाच्या भरात बॅट जमिनीवर आपटतात, पण त्यानंतर आपली चुक समजल्यावर ते बॅटचे काही नुकसान झाले नाही ना, हेदेखील पाहत असतात. पण भारताचा यष्टीरक्षक आणि फलंदाज रिषभ पंत मात्र आपल्या बॅटवर हातोड्याने प्रहार करताना दिसला आणि बऱ्याच जणांना धक्का बसला. पंत असे का करत होता, हे तुम्हाला माहिती आहे का...
आतापर्यंत क्रिकेट विश्वात झालेल्या महान खेळाडूंकडे पाहिले तर त्यांनी बॅट आपटल्याचे पाहायला मिळाले नाही. सचिन तेंडुलकर तर आपली बॅट स्वत: दुरुस्त करायचा. आपली बॅट त्याने कधीही कोणाच्या हातात दिली नव्हती. त्यामुळे फलंदाजासाठी बॅटचे किती महत्व आहे, हे समजू शकतो.
पंत नेमके काय करत होता, ते पाहा
भारतीय संघ ब्रिस्बेनला दाखल झाला आहे. भारतीय संघ सराव करत असताना पंत आपल्या बॅटवर हातोड्याने प्रहार करत असल्याचे दिसत आहे. यावर पंत म्हणाला की, " बॅटवर कुठे फटका लागतो की कसा आवाज येतो, हे मी पाहत होतो."
Web Title: IND vs AUS: How Rishabh Pant was doing a hammer on the bat
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.