भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील निर्णायक सामना आज सायंकाळी 7:00 वाजता हैदराबादमध्ये खेळला जाणार आहे. हा सामना जिंकणारा संघ मालिका विजेता असणार आहे. आजच्या या सामन्यात टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आपल्या नावे एक मोठा विक्रम करू शकतो. खरे तर अद्यापपर्यंत कुण्याही भारतीय फलंदाजाला हा महान विक्रम आपल्या नावे करता आलेला नाही.
आज कोहली आपल्या नावे करणार हा महान विक्रम?ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आजच्या तिसऱ्या T20 सामन्यात विराट कोहलीने 85 धावा केल्या, तर तो एकूण T20 क्रिकेटमध्ये 11,000 धावांचा टप्पा गाठणारा भारताचा पहिला फलंदाज ठरेल. आत्तापर्यंत कोणत्याही भारतीय फलंदाजाला हा महान विक्रम करता आलेला नाही. विराट कोहलीने हा विक्रम केल्यास, ही भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एक मोठी कामगिरी असेल.
कुण्याही भारतीय फलंदाजाला करता आलेला नाही हा विक्रम - विराट कोहलीने आतापर्यंत एकूण 351 टी-20 सामन्यांत 40.12 च्या सरासरीने 10915 धावा कुटल्या आहेत. यामुळे आणखी 85 धावा करताच तो टी20 क्रिकेटमध्ये 11000 अथवा त्याहून अधिक धावां करणारा भारताचा पहिला तर जगातील चौथा फलंदाज ठरेल. ओव्हरऑल टी20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत ख्रिस गेल, शोएब मलिक आणि किरोन पोलार्ड यांनीच 11000 अथवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत.
टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज -1. ख्रिस गेल (वेस्टइंडीज) - 463 सामने - 14562 धावा
2. शोएब मलिक (पाकिस्तान) - 481 सामने 11902 धावा
3. किरोन पोलार्ड (वेस्टइंडीज) - 613 सामने 11902 धावा
4. विराट कोहली (भारत) - 351 सामने 10915 धावा
5. डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) - 328 सामने 10870 धावा