India vs Australia Test , Pat Cummins : ऑस्ट्रेलियन संघाचं काही खरं नाही. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत सलग दोन पराभवानंतर ऑस्ट्रेलिया कर्णधार पॅट कमिन्सने कौटुंबिक कारणास्तव मायदेशात परतला आहे. त्यात जोश हेझलवूडनेही मालिकेतून माघार घेतली आहे. कमिन्ससोबत तोही फ्लाईट पकडून मायदेशासाठी रवाना झाला आहे. त्यात दुखापतग्रस्त डेव्हिड वॉर्नरचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. न्यूजकॉर्पच्या वृत्तानुसार, २९ वर्षीय कमिन्स इंदूरमधील तिसर्या कसोटीपूर्वी काही दिवसांसाठी सिडनीला रवाना झाला आहे. इंदूरमधील तिसऱ्या कसोटीपूर्वी तो भारतात परतण्याची शक्यता आहे. मालिकेतील तिसरा कसोटी सामना बुधवार १ मार्चपासून सुरू होत आहे.
भारताने रविवारी दिल्लीत ऑस्ट्रेलियाचा सहा गडी राखून पराभव करून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्वतःकडे कायम राखली. कमिन्सने मालिकेत आतापर्यंत तीन विकेट घेतल्या आहेत. भारताकडून सलग दोन मानहानीकारक पराभवानंतर ऑस्ट्रेलियाला आता मोठा धक्का बसला आहे. त्यांनी यापूर्वीच बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे दोन सामने गमावले आहेत आणि आता त्यांचा कर्णधार पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाला परतला आहे. कमिन्स कुटुंबातील आजारपणामुळे तो आज सकाळी ऑस्ट्रेलियाला रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात, ऑस्ट्रेलियन लेग-स्पिनर मिचेल स्वीपसन त्याच्या पहिल्या मुलाच्या जन्मासाठी मायदेशी परतला होता. त्याच्याजागी क्वीन्सलँडचा सहकारी मॅथ्यू कुहेनेमनने पदार्पण केले होते.
त्यात जोश हेझलवूडनेही माघार घेतली आहे. दुखापतग्रस्त डेव्हिड वॉर्नरला बरे होण्यासाठी मायदेशात पाठवण्यात येणार असल्याचे वृत्तही समोर आले आहे. Nine papersच्या वृत्तानुसार अॅश्टन अॅगर आणि मॅच रॅनशॉ हेही मायदेशात परतणार आहेत. कॅमेरून ग्रीन व मिचेल स्टार्क हे तिसऱ्या कसोटीत खेळण्यासाठी फिट झाले आहेत.
- तिसरी कसोटी इंदूर : १ मार्चपासून सुरू होईल
- चौथी कसोटी अहमदाबाद – ९ ते १३ मार्च.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"