IND vs AUS Test Series । नवी दिल्ली : सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पहिले 2 सामने जिंकून यजमान भारतीय संघाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. खरं तर पहिल्या दोन्हीही सामन्यात भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव केला. दोन्हीही सामन्यात फिरकीपटू गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात विराट कोहलीने शानदार फलंदाजी केली. अशातच ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजी प्रशिक्षकाने एक मोठे विधान करत कांगारूच्या फलंदाजांचे कान टोचले आहेत.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाचे फलंदाजी प्रशिक्षक मायकेल डी वेनूटो यांनी मंगळवारी दिल्ली कसोटीत भारताकडून 6 गडी राखून झालेल्या पराभवानंतर संघाच्या ड्रेसिंग रुममधील गोंधळाचा खुलासा केला. "हे स्लो मोशनमध्ये कार अपघातासारखे होते, नाही का?", असे ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकांनी सिडनी मॉर्निंग हेराल्डशी संवाद साधताना सांगितले. ऑस्ट्रेलियाच्या संघाने 28 धावांत 8 गडी गमावल्यानंतर मायकेल डी वेनूटो यांनी म्हटले, "तिथे अचानक काय घडले आहे असे वाटते? आम्ही जे पाहिले ते तुम्ही पाहिले. ही फक्त सातत्याने भीती दाखवणारी दहशत आहे." स्वस्तात बाद झाल्यानंतर स्टीव्ह स्मिथने पुन्हा एकदा ड्रेसिंग रूममध्ये बॅट फेकून राग व्यक्त केला होता. "तो बाद झाला तेव्हा तो नक्कीच निराश झाला होता आणि त्याने ड्रेसिंग रूममध्ये खराब शॉट असल्याचे सांगितले", असे ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकांनी स्मिथबद्दल सांगितले.
स्वीप शॉर्ट्स खेळणे पडले महागात दुसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन संघ खूप पुढे होता. पण आम्हाला आणखी 50 धावा लवकर मिळाल्या असत्या तर (ज्या भारतात शक्यतो मिळत नाहीत) निकाल वेगळा लागला असता पण तसे झाले नाही. परंतु दबाव विचित्र गोष्टी करतो आणि आम्ही पाहिले की बरेच लोक आक्रमक होऊन स्कोअर करण्याचा प्रयत्न करतात. ही निराशा नाही, परंतु 90 मिनिटांची फलंदाजी नक्कीच काही खास नव्हती. स्वीप करण्याचा प्रयत्न करताना अनेक ऑस्ट्रेलियन फलंदाज बाद झाले", अशा शब्दांत मायकेल डी वेनूटो यांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांची चूक सांगितली.
BGT मालिकेत भारताचे वर्चस्व भारतीय संघ सध्या मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून रोहित सेनेने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. या दोन सामन्यात कोहलीने काही खास कामगिरी केली नाही, तरीदेखील त्याने आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25 हजार धावांचा आकडा पूर्ण करून सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे. त्याने दिल्ली येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात 64 धावा केल्या.
तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जयदेव उनाडकट.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"