IND vs AUS 2nd ODI live : तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला वन डे सामना जिंकून यजमान भारतीय संघाने विजयी सलामी दिली आहे. आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा वन डे सामना खेळवला जात आहे. या सामन्याच्या पूर्वसंध्येला टीम इंडियाला मोठा झटका बसला असून जसप्रीत बुमराह संघाबाहेर झाला आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वन डेसाठी संघासोबत इंदौरला गेला नाही.
दरम्यान, बुमराह त्याच्या कुटुंबीयांना भेटायला गेला आहे, त्यामुळे संघ व्यवस्थापनाने त्याला छोटा ब्रेक दिला आहे. दुसऱ्या वन डेसाठी बुमराहच्या जागी वेगवान गोलंदाज मुकेश कुमार संघात सामील झाला आहे. बुमराह राजकोट येथे होणाऱ्या अंतिम वन डेसाठी संघात सामील होणार आहे.
खरं तर ५ ऑक्टोबरपासून भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. या विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर ही मालिका दोन्हीही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. भारतीय संघाने पहिला सामना जिंकून विजयी सलामी दिली आहे. आज मालिकेतील दुसरा सामना खेळवला जात असून टीम इंडिया रोहित शर्माच्या अनुपस्थितीत लोकेश राहुलच्या नेतृत्वात मैदानात आहे.
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या २ सामन्यांसाठी भारतीय संघ -लोकेश राहुल (कर्णधार), रवींद्र जडेजा (उप कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
अखेरच्या सामन्यासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल, इशान किशन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
भारत आणि ऑस्ट्रेलिया वन डे मालिका
- पहिला सामना - २२ सप्टेंबर - मोहाली
- दुसरा सामना - २४ सप्टेंबर - इंदौर
- तिसरा सामना - २७ सप्टेंबर - राजकोट