India vs Australia T20I Series : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात उद्यापासून तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. त्यासाठी दोन्ही संघांचे खेळाडू मोहाली येथे पोहोचले आहेत आणि कसून सराव करत आहेत. रविवारी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit sharma) याने पत्रकार परिषद घेतली आणि त्यात आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंबधीत प्रश्नावर रोहितने उत्तरं दिली. पण, याच पत्रकार परिषदेतील रोहितचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यात पत्रकाराच्या प्रश्नावर रोहितने मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.
एका पत्रकाराने भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील संघ बांधणीबाबत विचारले आणि त्यावर संघ ९०-९५ टक्के सेटल असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच पत्रकाराने भारतीय महिला गोलंदाज झुलन गोस्वामी यांच्याबद्दल एक प्रश्न विचारला आणि त्यावर रोहितने मजेशीर उत्तर दिले. रोहित म्हणाला, कितने सराल पुछते हो? ( किती प्रश्न विचारतोस तू?) रोहितच्या या रिअॅक्शन हश्शा पिकला.
रोहितने मोहालीत पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले, "कधीकधी के.एल राहुलच्या कामगिरीकडे लक्ष दिले जात नाही. त्याने भारतीय संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. विराट कोहली हा विश्वचषकासाठी आमचा तिसरा सलामीवीर म्हणून पर्याय आहे. संघाकडे पर्याय उपलब्ध असणे नेहमीच चांगले असते. तसेच आम्ही तिसरा सलामीवीर न घेतल्याने विराट उघडपणे ओपन करू शकतो." एकूणच रोहित शर्माने के.एल राहुलची पाठराखण करत किंग कोहली सलामीला खेळू शकतो असे संकेत दिले आहेत.
"माझी राहुल द्रविड यांच्याशी चर्चा झाली आणि आम्ही ठरवले की मला काही सामन्यांमध्ये विराटसोबत सलामी करावी लागेल. आम्ही मागील काही सामन्यांमध्ये ते पाहिले आहे आणि आनंदी आहोत. विराटने आशिया चषकात अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात शानदार कामगिरी केली होती."
के.एल राहुलची केली पाठराखण कर्णधार रोहितने संघाचा प्लॅन सांगताना म्हटले, "मला वाटत नाही की आम्ही नवीन प्रयोग करणार आहोत. के.एल राहुल आमचा सलामीवीर फलंदाज असणार आहे. त्याने केलेल्या कामगिरीकडे नेहमीच दुर्लक्ष केले गेले आहे. एक किंवा दोन वाईट खेळी भूतकाळातील विक्रमांवर पडदा टाकू शकत नाहीत. आम्हाला माहिती आहे के. एल राहुलमध्ये काय प्रतिभा आहे आणि काय नाही त्याने भारतीय संघासाठी चांगली कामगिरी केली आहे", अशा शब्दांत रोहित शर्माने के.एल राहुल सलामीचा फलंदाज असल्याचे स्पष्ट केले आहे.