ऑस्ट्रेलियाची स्फोटक सुरूवात पण पांड्या बनला 'संकटमोचक', भारताचे सामन्यात पुनरागमन

ind vs aus live match, hardik pandya : आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील निर्णायक वन डे सामना खेळवला जात आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 02:45 PM2023-03-22T14:45:37+5:302023-03-22T14:46:12+5:30

whatsapp join usJoin us
ind vs aus live match Hardik Pandya dismissed Travis Head and Steve Smith to bring India back into the match   | ऑस्ट्रेलियाची स्फोटक सुरूवात पण पांड्या बनला 'संकटमोचक', भारताचे सामन्यात पुनरागमन

ऑस्ट्रेलियाची स्फोटक सुरूवात पण पांड्या बनला 'संकटमोचक', भारताचे सामन्यात पुनरागमन

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ind vs aus 3rd ODI live । चेन्नई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 सामन्यांच्या वन डे मालिकेतील आज अखेरचा सामना चेन्नई येथे खेळवला जात आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकून यजमान भारतीय संघाने विजयी सलामी दिली होती. तर दुसऱ्या सामन्यात पाहुण्या ऑस्ट्रेलियाचे संघाने विजय मिळवून 1-1 अशी बरोबरी साधली. त्यामुळे आजचा सामना निर्णायक ठरणार आहे. 

दरम्यान, मागील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने ट्वेंटी-20 सारखा खेळ दाखवत भारताचा दारूण पराभव केला होता. मिचेल स्टार्कने सर्वाधिक 5 बळी घेत भारतीय फलंदाजीची कंबर मोडली होती. अखेरच्या निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने स्फोटक सुरूवात केली. ट्रॅव्हिस हेडने 33 धावांची खेळी केली, 4 चौकार आणि 2 षटकार ठोकून आक्रमक पवित्रा दाखवणाऱ्या हेडला पांड्याने बाहेरचा रस्ता दाखवला. तर कर्णधार स्टीव्ह स्मिथला (3) हार्दिक पांड्याने स्वस्तात माघार पाठवले. 13 षटकांपर्यंत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 2 बाद 78 एवढी झाली आहे.

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - 
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी. 

आजच्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ -
स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, मार्नस लाबूशेन, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉइनिस, ॲश्टन अगर, शॉन ॲबॉट, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 
 

Web Title: ind vs aus live match Hardik Pandya dismissed Travis Head and Steve Smith to bring India back into the match  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.