ind vs aus 3rd ODI live । चेन्नई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 सामन्यांच्या वन डे मालिकेतील आज अखेरचा सामना चेन्नई येथे खेळवला जात आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकून यजमान भारतीय संघाने विजयी सलामी दिली होती. तर दुसऱ्या सामन्यात पाहुण्या ऑस्ट्रेलियाचे संघाने विजय मिळवून 1-1 अशी बरोबरी साधली. त्यामुळे आजचा सामना निर्णायक ठरणार आहे.
दरम्यान, मागील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने ट्वेंटी-20 सारखा खेळ दाखवत भारताचा दारूण पराभव केला होता. मिचेल स्टार्कने सर्वाधिक 5 बळी घेत भारतीय फलंदाजीची कंबर मोडली होती. अखेरच्या निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. लक्षणीय बाब म्हणजे आजचा सामना पाहायला भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी उपस्थित असणार आहे.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी.
नाणेफेकीनंतर रोहितने म्हटले, "आम्हीही प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा विचार करत होतो. इथे गोलंदाजांना अधिक मिळत असेल तर शेवटच्या सामन्याप्रमाणे आज आम्ही तीन फिरकीपटूंसोबत खेळत आहोत. फायनलचा सामना खेळणे नेहमीच रोमांचक असते. मागील सामन्यात जे घडले त्यानंतर पुनरागमन करणे आणि जेव्हा सर्वात महत्त्वाचे असते तेव्हा दबावाखाली चांगले क्रिकेट खेळणे हे आमच्यासाठी एक आव्हान आहे. सर्वोत्तम क्रिकेट खेळून मालिका जिंकण्याचा प्रयत्न करू." म्हणजेच ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली असली तर रोहितच्या म्हणण्यानुसार भारताला प्रथम क्षेत्ररक्षण करण्याची संधी मिळाली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: ind vs aus live match In the third match Australia has won the toss and decided to bat first
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.