ind vs aus 3rd ODI live । चेन्नई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 सामन्यांच्या वन डे मालिकेतील आज अखेरचा सामना चेन्नई येथे खेळवला जात आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकून यजमान भारतीय संघाने विजयी सलामी दिली होती. तर दुसऱ्या सामन्यात पाहुण्या ऑस्ट्रेलियाचे संघाने विजय मिळवून 1-1 अशी बरोबरी साधली. तिसऱ्या सामन्यात कांगारूच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 49 षटकांत सर्वबाद 269 धावा केल्या. भारतीय गोलंदाजांनी चमक दाखवली पण ऑस्ट्रेलियाने सांघिक खेळी करून धावा 250 पार नेल्या. 251 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने शानदार सुरूवात केली.
रोहित शर्मा आणि शुबमन गिल या जोडीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी सुरूवातीला वेळ घेतला आणि दोघांनीही डाव पुढे नेला. दोन्ही फलंदाज चांगले फटके मारून धावा करत असताना ऑस्ट्रेलियन फिरकीपटूंना डाव साधला आणि हिटमॅनला तंबूत पाठवले. ॲबॉटच्या 10व्या षटकातील पहिल्या चेंडूवर रोहित शर्मा बाद झाला.
कर्णधार बाद झाल्यानंतर गिलने डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण त्याला अपयश आले. ॲडम झाम्पाने त्याला आपला बळी बनवले. 13व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर झाम्पाने गिलला बाद केले. चेंडू गिलच्या पॅडला लागला आणि ऑस्ट्रेलियाने अपील केले, जे पंचांनी फेटाळले. पण ऑस्ट्रेलियाने रिव्ह्यू घेतला ज्यात गिल बाद झाल्याचे समोर आले. रोहित शर्मा 17 चेंडूत 30 धावा करून तर शुबमन गिल 49 चेंडूत 37 धावा करून बाद झाला.
ऑस्ट्रेलियाची सांघिक खेळी
ऑस्ट्रेलियाच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ट्रॅव्हिस हेड (33) आणि मिचेल मार्श (47) या जोडीने भारताची डोकेदुखी वाढवली. स्फोटक सुरूवात करून कांगारूने यजमानांवर दबाव टाकला. पण हार्दिक पांड्याने कांगारूच्या फलंदाजीला सुरूंग लावत एका पाठोपाठ 3 मोठे झटके दिले. पांड्याने हेड, कर्णधार स्टीव्ह स्मिथ याशिवाय आक्रमक वाटणाऱ्या मिचेल मार्शला बाद करून भारतीय चाहत्यांना जागे केले. ऑस्ट्रेलियन संघाकडून कोणालाच मोठी भागीदारी करता आली नाही. पण सांघिक खेळी करत कांगारूंनी डाव पुढे नेला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने सर्वाधिक (47) धावांची खेळी केली. तर डेव्हिड वॉर्नर (23), ॲलेक्स कॅरी (38), मार्कस स्टॉयनिस (25), सीन ॲबॉट (25) आणि ॲश्टन अगर (17) धावा करून बाद झाला.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी.
आजच्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ -
स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, मार्नस लाबूशेन, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉइनिस, ॲश्टन अगर, शॉन ॲबॉट, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: ind vs aus live match Rohit Sharma and Shubman Gill lost wickets, Ashton Agar and Adam Zampa take breakthrough for australia
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.