Join us  

IND vs AUS: भारतीय संघाकडून आता अपेक्षा आणखी उंचावल्या

भारताने ऑस्ट्रेलियामध्ये कधीही कसोटी मालिका जिंकलेली नाही. त्यामुळे आता अशा धमाकेदार सुरुवातीनंतर संघाकडून आणखी आशा उंचावल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 1:34 AM

Open in App

- अयाझ मेमन ७१ वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारताने ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकण्याची कामगिरी केली आणि ही खूप अभिमानास्पद कामगिरी आहे. सामना अत्यंत अटीतटीचा झाला आणि यजमानांनी जबरदस्त टक्कर दिली. एकूण या मालिकेची रंगत आता आणखी वाढली असून, उत्सुकता ताणली गेली आहे. भारताने ऑस्ट्रेलियामध्ये कधीही कसोटी मालिका जिंकलेली नाही. त्यामुळे आता अशा धमाकेदार सुरुवातीनंतर संघाकडून आणखी आशा उंचावल्या आहेत.हा विजय महत्त्वपूर्ण आहे. कारण या आधीच्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातही यजमान संघ म्हणावा तसा मजबूत नव्हता, पण तरीही कागदावर मजबूत असलेल्या भारतीय संघाला मालिका जिंकता आली नव्हती. त्यामुळे आता विराट आणि संघाने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. आता पुढील सामन्यांतही भारतीय संघाला आपल्या कामगिरीत सातत्य ठेवावे लागेल.खेळाडूंच्या कामगिरीविषयी म्हणायचे झाल्यास गोलंदाज शानदार ठरले. जर तुम्ही प्रतिस्पर्धी संघाचे २० बळी घेत असाल, तर तुमच्या संघाची ताकद दिसून येते. वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटू अश्विनने खूप चांगले प्रदर्शन केले, पण २०१८ वर्षातील संघाची कामगिरी पाहिल्यास, भारतीय संघाच्या फलंदाजांनी मात्र गोलंदाजांप्रमाणे छाप पाडलेली नाही. त्यामुळे या सामन्यातील फलंदाजांचे अपयश पाहून मला फारसे आश्चर्य वाटले नाही. या सामन्यात हीरो ठरला तो चेतेश्वर पुजारा आणि यामध्ये दुमत कोणाचेच नसेल. ज्या सामन्यात ३०० धावा बनविणे कठीण दिसत होते, तिथे भारताने २५० धावा उभारल्या आणि यातील १२३ धावा एकट्या पुजाराने काढल्या, शिवाय दुसºया डावात त्याने ७१ धावा केल्या. जर पुजाराची खेळी बाजूला केली, तर भारताची काय अवस्था झाली असती, याचा अंदाज आपण लावू शकतो. त्यामुळेच या सामन्यात पुजारा निर्णायक ठरला आणि त्याने कसोटीमध्ये फलंदाजी कशी करावी, याचे सर्वांना धडेही दिले.पहिल्या डावात भारताचे प्रमुख फलंदाज झटपट परतले असले, तरी दुसºया डावात मात्र त्यांनी जबाबदारीने फलंदाजी केली. पुजारासह, कोहली आणि रहाणे यांनीही दुसºया डावात चांगली खेळी केली. शिवाय अडखळणारा लोकेश राहुलनेही काही प्रमाणात फॉर्म मिळविल्याचे दिसून आले. विदेशातील गेल्या काही सामन्यांमध्ये भारताची फलंदाजी केवळ कोहलीवर अवलंबून असल्याचे दिसून आले होते. आता इतर फलंदाजही जागे झाल्याचे दिसले.रोहित शर्मावर प्रश्नचिन्हरोहित शर्माला वैयक्तिकरीत्या हा सामना चांगला ठरला नाही. त्याचे या सामन्यात विशेष योगदान राहिले नाही. पहिल्या डावात त्याने नक्कीच चांगली फलंदाजी केली, पण ज्याप्रकारे तो बाद झाला, त्यावर अनेक जण नाराज झाले. षटकार मारण्याच्या नादात झेल बाद होता-होता वाचल्यानंतर, पुन्हा तसाच फटका मारण्याची काहीच गरज नव्हती, शिवाय हा सामना मर्यादित षटकांचाही नव्हता. त्यामुळे घाई करण्यात काहीच अर्थ नव्हता.दुसºया डावातही तो काही विशेष छाप पाडू शकला नाही. त्यामुळे माझ्यामते त्याला कसोटीत संधी मिळण्याची शक्यता कमी दिसत आहे. त्यामुळे संघातील जागा निश्चित करण्याइतपत तरी चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा त्याच्याकडून आहे. जर दुसºया सामन्यात पृथ्वी शॉ परतला नाही, तर रोहितचे स्थान राहू शकेल. मात्र, त्याच वेळी बदल झाला, तर हनुमा विहारीला खेळविताना रोहितला बाहेरही केले जाऊ शकते.

(लेखक संपादकीय सल्लागार आहेत.)

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहली