ठळक मुद्दे हे पाहता पार्थिव पटेल आणि रोहित शर्मा यांच्याकडून सलामी करता येऊ शकते.हित हा काही दिवसांपूर्वी मायदेशी परतणार, अशी चर्चा होती. भारतीय संघात पार्थिव पटेल हा राखीव यष्टीरक्षक आहे.
मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : दोन्ही सामन्यांत भारताचे सलामीवीर लोकेश राहुल आणि मुरली विजय चांगली सलामी देण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यासाठी कोणी ओपनिंग करायची, हा प्रश्न भारतीय संघापुढे असेल. या प्रश्नाचे उत्तर पार्थिव पटेलही असू शकते.
दुसऱ्या सामन्यात जिथे ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी दमदार फलंदाजी केली होती. तिथे भारताच्या सलामीवीरांना दोन्ही डावात मिळून 50 धावाही काढता आल्या नव्हत्या. पण ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी पहिल्या डावात शतकी आणि दुसऱ्या डावात अर्धशतकी सलामी दिली होती. त्यामुळे आता या दोन्ही सलामीवीरांना डच्चू द्यावा, अशी भावना चाहत्यांच्या मनात आहे. पृथ्वी शॉ याला पहिल्या सामन्यापूर्वी सराव करताना दुखापत झाली होती. त्यामुळे तो आगामी दौऱ्यात खेळू शकणार नाही. दुसरीकडे रोहित शर्माही वैयक्तिक कारणास्तव मायदेशी परतणार आहे. त्यामुळे भारतीय संघापुढे सलामीचा यक्षप्रश्न उभा राहिल्याचे म्हटले जात आहे.
भारतीय संघात पार्थिव पटेल हा राखीव यष्टीरक्षक आहे. आतापर्यंत दोन्ही सलामीवीर हे चांगली कामगिरी करण्यात कुचकामी ठरले आहेत. हे पाहता पार्थिव पटेल आणि रोहित शर्मा यांच्याकडून सलामी करता येऊ शकते. रोहित हा काही दिवसांपूर्वी मायदेशी परतणार, अशी चर्चा होती. पण संघ व्यवस्थापनाने रोहितला ऑस्ट्रेलियामध्ये कायम ठेवले आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात रोहितला संधी मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. पण संघ व्यवस्थापन राहुल आणि मुरली या दोघांना डच्चू देऊन पार्थिव आणि रोहित यांना सलामीची संधी देणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
संजय मांजरेकर यांनी सोडवला ओपनिंगचा यक्षप्रश्न
आता तिसऱ्या सामन्यासाठी कोणी ओपनिंग करायची, हा प्रश्न भारतीय संघापुढे असेल. या प्रश्नाचे उत्तर भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी दिले आहे.
मांजरेकर यांनी म्हटले आहे की, " दुसऱ्या सामन्यासाठी राहुल आणि विजय या दोघांनाही संघाबाहेर काढायला हवे. तिसऱ्या सामन्यासाठी सलामीवीर म्हणून मयांक अगरवालचे संघात आगमन झाले आहे. त्यामुळे त्याला सलामीची संधी द्यावी. त्याचबरोबर मयांकच्या जोडीला अष्टपैलू हनुमा विहारीला सलामीची संधी द्यायला हवी. कारण त्याची फलंदाजी पाहिल्यावर तो चांगली सलामी देऊ शकतो, असे दिसत आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यासाठी मयांक आणि हनुमा यांनी सलामीला यायला हवे. "
Web Title: IND vs AUS: Parthiv Patel can also make India's opening, read it...
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.