पर्थ : ऑस्ट्रेलियाला पहिल्या कसोटी सामन्यात पराभव स्वीकारावा लागला असला तरी पर्थमध्ये शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात यजमान संघाचे पारडे वरचढ राहील, असा विश्वास ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने व्यक्त केला.पाँटिंगच्या मते पर्थ येथील नवी खेळपट्टी ऑस्ट्रेलिया संघासाठी अनुकूल राहील. पाँटिंग म्हणाला, ‘माझ्या मते पर्थची खेळपट्टी भारतीय खेळाडूंच्या तुलनेत आमच्या खेळाडूंसाठी अधिक अनुकूल ठरेल. पण ऑस्ट्रेलिया संघाला पहिल्या लढतीतील पराभवातून लवकर सावरावे लागेल. ऑस्ट्रेलियन खेळाडूंना संघातील उणिवा लवकर दूर कराव्या लागतील आणि पहिल्या लढतीत झालेल्या चुकांपासून बोध घ्यावा लागेल.’
- Cricket Buzz»
- बातम्या»
- IND vs AUS: भारताच्या तुलनेत ऑसीसाठी पर्थ लाभदायक : पाँटिंग
IND vs AUS: भारताच्या तुलनेत ऑसीसाठी पर्थ लाभदायक : पाँटिंग
पर्थमध्ये शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात यजमान संघाचे पारडे वरचढ राहील, असा विश्वास ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने व्यक्त केला.
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 1:32 AM