Join us  

IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामना पाहण्यासाठी PM मोदी अहमदाबादमध्ये येणार

IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना पाहण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधनांनाही आमंत्रित केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2023 6:23 PM

Open in App

India vs Australia Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 सामन्यांची कसोटी मालिका 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. ही मालिका बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी म्हणूनही ओळखली जाते. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC फायनल) च्या फायनलसाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. दरम्यान, मालिकेतील चौथ्या सामन्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) अहमदाबाद येथे होणारा कसोटी सामना पाहण्यासाठी जाणार आहेत.

पंतप्रधान मोदी अहमदाबादला जाणार आहेत

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अहमदाबाद येथे होणार्‍या मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना पाहण्यासाठी पंतप्रधान मोदीही स्टेडियमवर पोहोचतील. एवढेच नाही तर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेतील या शेवटच्या सामन्याचे साक्षीदार होण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे पीएम अँथनी अल्बानीज (anthony albanese) देखील भारतात येणार आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, दोन्ही देशांचे पंतप्रधान स्टेडियममध्ये खेळाडूंना प्रोत्साहन देताना दिसतील.

9 मार्चपासून कसोटी सुरू होणार 

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमपैकी एक आहे. या स्टेडियममध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील चौथा कसोटी सामना 9 मार्चपासून सुरू होणार आहे. विशेष म्हणजे या स्टेडियमला ​​पीएम मोदींचे नाव देण्यात आले असल्याने ते पहिल्यांदाच क्रिकेट सामना पाहण्यासाठी अहमदाबादला जाणार आहेत.

पहिली कसोटी नागपुरात होणार आहे

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियन संघ भारतात येणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना 9 फेब्रुवारीपासून नागपुरात सुरू होणार आहे. या मालिकेतील पुढील तीन कसोटी सामने दिल्ली, धर्मशाला आणि अहमदाबाद येथे होणार आहेत. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचे सर्व सामने जिंकणे भारतासाठी खूप महत्त्वाचे आहे. टीम इंडियाने हे सर्व सामने जिंकल्यास वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचा प्रबळ दावेदारही होईल.

टॅग्स :नरेंद्र मोदीभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलिया
Open in App